लाइव न्यूज़
 • 12:22 PM

  नवी दिल्ली - लोकसभेत टीडीपीने मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाल लोकसभा अध्यक्षांकडून मंजुरी.

 • 12:21 PM

  नवी दिल्ली - लोकसभेत विरोधकांकडून सरकारविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव दाखल.

 • 12:20 PM

  जालना : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचे 4 टँकर अडवले, टँकरमधील 4 हजार लिटर दूध रस्त्यावर सांडले

 • 11:59 AM

  माणिकराव ठाकरेंचा उपसभापतीपदाचा राजीनामा.

 • 11:56 AM

  पुणे : राम मंदिर व्हायलाच हवं, पण निवडणुकांसाठी त्याच भांडवल करता कामा नये - राज ठाकरे

 • 11:56 AM

  पुणे : NEET परीक्षेनंतर अॅडमिशनसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळायला हवं - राज ठाकरे

 • 11:53 AM

  पुणे : अमूलचं दूध महाराष्ट्रात आणण्यासाठी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं, दूध आंदोलनात राज्य सरकार दोषी - राज ठाकरे

 • 11:42 AM

  पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पत्रकार परिषद

 • 11:28 AM

  सोलापूर : शेळवे येथील तुकाराम सोपान गाजरे या शेतकऱ्याने शेततळ्यात दूध ओतले

 • 11:25 AM

  आंध्रे प्रदेशला विशेष दर्जा देण्याची टीडीपीची मागणी.

 • 11:23 AM

  नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गदारोळ, लोकसभेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी.

 • 10:12 AM

  चेन्नई : डीएमके पक्षाचे प्रमुख एम. करुणानिधी कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल.

 • 09:54 AM

  गोंदिया : गोंदियावरुन कामठा पांजरामार्गे आमगावकडे जाणारा दुधाचा टँकर पांगोली नदीत वाहून गेला

 • 09:50 AM

  स्वाभिमानी संघटनेचं आंदोलन अजून तीव्र होणार, उद्यापासून जनावरांसोबत महामार्ग रोखणार, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

 • 09:40 AM

  सोलापूर : बेगमपुर येथील नेचर डिलायटचे दुध संकलन केंद्र फोडले, 20 हजार लिटर दुधाच्या टाक्या रिकाम्या

All post in लाइव न्यूज़

वृषभ

आज

१८ जुलै २०१८

आठवड्याचे भविष्य

उत्साह व आनंदात आठवड्याची सुरुवात होईल. कौटुंबिक वातावरणही प्रसन्न असेल. नोकरी व्यवसायात संधी हात जोडून उभ्या राहतील पण योग्य-अयोग्याचा विचार करूनच निर्णय घ्यावा. विद्यार्थीवर्ग स्पर्धा-परीक्षांमध्ये स्वत:च्या वक्तृत्वाने अग्रेसर राहतील. प्रेमी युगुलांना प्रणयात शुभ कालावधी. खेळाडू खेळाचे मैदान गाजवतील. पण विरोधकांच्या कारवायांकडे डोळेझाक करू नका. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. नियोजनपूर्वक काम केल्यास प्रतिकूलतेवर मात करता येईल. पण अति धाडस करणे टाळा. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. गर्भवती महिलांनी गाफिल राहू नये. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. परिश्रमातून धनलाभाचे योग.
शुभदिनांक ३,४
 

मासिक भविष्य

आर्थिकदृष्ट्या आपणास अनुकूल लाभदायी ठरेल. कुटुंबातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. घरातील वातावरण आनंदमयी होईल. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन वस्तूंची खरेदी होईल. स्थितप्रज्ञ राहून आपली सर्व कामे मार्गी लावता येणे सहज शक्य होईल. घरात शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला व्यवसायाच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरेल. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. संततीस उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणाºयांना यश मिळेल. मनस्वास्थ लाभेल. पाहुण्यांच्या स्वागतास सज्ज रहावे लागेल. पूर्वनियोजित कामात बदल करावे लागतील. नवीन कल्पना आकार घेतील. सतत  शुभशकुनांचा सतत प्रत्यय येईल. गुरुची कृपा आपल्या प्रयत्नांना यश देईल. तरुणांच्या कौशल्याच चांगला वाव मिळेल. नोकरीत बढती-बदलीचे योग येतील. आपण पूर्वी केलेल्या कार्याची वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल. करमणुकीच्या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल.  हौसेमौजे खातर खर्च केला जाईल. मानसिक स्वास्थ लाभेल. भावंडसौख्य लाभेल. भावंडांची रेंगाळलेली कार्य मार्गी लागतील. विवाह जुळण्याचे योग आहेत. नवपरिणितांना गोड बातमीची चाहूल लागेल. सुवार्ता कानी येतील.

प्रमोटेड बातम्या