लाइव न्यूज़
 • 06:35 PM

  सिंधुदुर्ग : मालवणात स्वाभिमान पक्षाचा मोर्चा, मच्छीमारांवरील अन्याय सहन करणार नसल्याचा इशारा, माजी खासदार निलेश राणेंनी केले नेतृत्व

 • 06:25 PM

  पीएनबी घोटाळा प्रकरण - मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने बेचू तिवारी, यशवंत जोशी आणि प्रफुल सावंत यांना 3 मार्चपर्यंत सुनावली पोलीस कोठडी

 • 06:10 PM

  चंद्रपूर : सावली बाजार समितीचे सचिव व लेखापाल निलंबित, लाच प्रकरणात चौकशीअंती प्रशासक मंडळाने केली कारवाई, नरेश सुरमवर व उमाजी पिपरे अशी त्यांची नावे आहेत.

 • 06:09 PM

  कोल्हापूरः बनावट नोटा तयार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक, अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त.

 • 06:07 PM

  पुणे : डी.एस. कुलकर्णी यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हलवावे, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली. ती न्यायालयाने मंजूर केली आहे.

 • 06:06 PM

  आंध्र प्रदेश : विजयवाडा रेल्वे स्टेशनवर महसूल गुप्तचर संचालनालयाने 406 कासव जप्त केले आहेत.

 • 05:49 PM

  गडचिरोली - बैलगाडीतून वाहून नेत असलेले साडेसहा लाखांचे सागवान लाकूड जप्त

 • 05:46 PM

  डोंबिवली : आसनगावजवळ डाऊन मार्गावर मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड, कसा-याकडे जाणारी वाहतूक बंद.

 • 05:18 PM

  प्राप्तिकर विभागाने रोटोमॅक कंपनीची 14 खाती गोठवली, त्यापैकी तीन खाती विक्रम कोठारी आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावे, प्राप्तिकर विभागातील सूत्रांची माहिती

 • 05:08 PM

  नाशिक- नाशिककरांवर 33 टक्के घरपट्टी वाढीचा बोजा, महासभेत भाजपाचा निर्णय, विरोधकांचा बहिष्कार

 • 04:48 PM

  वणी (यवतमाळ) : गुप्तधनासाठी पत्नीचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर महिलेचा पती गजानन डाहुले याने मंगळवारी दुपारी ३ वाजता मारेगाव तालुक्यातील टाकळी येथे स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

 • 04:27 PM

  सार्कच्या संसदीय समितीने मालदीवमध्ये लोकशाहीच्या पुनर्स्थापनेचे केले आवाहन

 • 03:25 PM

  भीमा-कोरेगाव हिंसा प्रकरण- एकबोटेंच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. 14 मार्चला सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी.

 • 02:57 PM

  नाशिक-मनपात भरती प्रक्रियेचे अधिकार आयुक्तांना. महापौर रजनी भानसी यांची महासभेत घोषणा. घोषणेनंतर राष्ट्रववादी, काँग्रेस व शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी. सभागृहात जोरदार गदारोळ.

 • 02:34 PM

  23 फेब्रुवारीला उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा अंदाज. गारपिटीसह पावसाचा हवामान खात्याचा इशारा. पिकांची काळजी घेण्याचं शेतकऱ्यांना आवाहन.

All post in लाइव न्यूज़

वृषभ

आज

२० फेब्रुवारी २०१८

आठवड्याचे भविष्य

नोकरी-व्यवसायात सर्व आघाड्यांवर यशस्वी वाटचाल असेल. आर्थिक कामे पार पाडण्यास हा आठवडा उत्तम सिद्ध होईल. गुंतवणूक करण्यास योग्य काळ. आत्मविश्वासात वाढ होईल. पण अस्मितेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. कालक्षेत्रातील मंडळींनी विनाकारण धाडस करू नये. भागीदारी व्यवसायात जपून पावले उचला, सावधानतेचा इशारा. हितशत्रूंच्या कारवाया वाढतील, त्यावर नजर ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातले अंदाज अचूक ठरतील. शरीरस्वास्थ्य जपावे लागेल. उष्णतेच्या त्रसापासून त्रस संभवतो. जोडीदाराच्या तब्येतीची जपणूक करा. विद्यार्थ्यांनी आता होऊ घातलेल्या परीक्षांचे वेळापत्रक नीट फॉलो करावे व त्याप्रमाणोच योजनाबद्ध अभ्यास केल्यास फळ मिळेल. ओळखीतून महत्वाची कामे पार पडतील. वारसाहक्काने काही फायदे संभवतात पण त्यासाठी झगडावे लागेल.

शुभदिनांक 23,24

मासिक भविष्य

विरोधकांच्या कारवायांना मोठय़ा युक्तीवादाने तोंड द्याल. हाती घेतलेल्या कामात आपणांस यश लाभेल. नोकरीच्या शोधात असणा:या तरुणांना चांगल्या संधी लाभतील. नवीन जबाबदा:या स्वीकाराल. सामाजिक क्षेत्रतील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल. वैवाहिकदृष्टीने विचार करता मात्र प्रतिकूल ग्रहमान आहे. नेत्रविकार, उष्णतेच्या विकारांचा त्रस होऊ शकतो. आरोग्याच्या जुन्या तक्रारी डोकेवर काढतील. अंधश्रद्धेला बळी पडू नका. व्यवसाय-उद्योगात भरभराट होईल. आपल्या बुद्घीचातुर्यावर मोठी मजल माराल. व्यवसाय-उद्योगातील आत्मविश्वास व कामाचा वेग वाढेल. व्यवसायात नवे तंत्र अंमलात आणू शकाल. जमीन खरेदी-विक्री व्यवहार करणारे, इमारत बांधकाम व्यवसायात असणा-यांना चांगल्या संधी येतील. विश्वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. मनातील कल्पना आकारात  घेतील. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल.अनावश्यक प्रवास टाळणो हिताचे आहे. महिलांनी कुवतीबाहेरील कामे टाळावी. शेजा-याचा त्रस वाटेल. सत्कार्यासाठी प्रवास घडून येतील. संतसज्जनांचा सहवास लाभेल.प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तू, महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळावेत. रेंगाळलेली कामे विनासायास मार्गी लागीतल. विद्याथ्र्याना उच्च शिक्षणासाठी स्पर्धा परीक्षा देऊन यश मिळेल.

प्रमोटेड बातम्या