लाइव न्यूज़
 • 05:17 AM

  मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने गुरुवारी, १८ जानेवारी रोजी वाशी बोर्डावर धडक मोर्चाची हाक दिली आहे.

 • 11:23 PM

  भिवंडी -  30 मुलांना अन्नातून विषबाधा, पाच जण गंभीर. उपचारासाठी 24 जणांना मुंबईतील नायर रुग्णालायत दाखल करण्यात आलं आहे. पाच जणांवर खाजगी रूग्णालयात तर एकावर इंदिरागांधी रूग्णालयांत उपचार सुरु. 

 • 10:53 PM

  नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठ ते दिंडोरी टोल नाका दरम्यान चारचाकीतून आलेल्या संशयितांनी चार चाकीवर केला गोळीबार

 • 10:48 PM

  भिवंडी - भिवंडीत मदरसा मधील मुलांना विषबाधा, १५ मुलांवर प्राथमिक उपचार करून त्यांना आज रात्री ९-३०वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केले दाखल

 • 10:45 PM

  गुजरातच्या समुद्र किना-याजवळ एमटी जेनेसा तेलवाहू जहाजाला आग लागली. जहाजावर 30,000 टन तेल असल्याचे नौदलाच्या प्रवक्ताने सांगितले.

 • 10:17 PM

  मुंबई : इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहून मुंबईत दाखल झाले असून त्यांचे स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 • 09:56 PM

  मध्य रेल्वेच्या सर्व लोकलमध्ये लागणार सीसीटीव्ही, २७६ कोटींच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाची मंजूरी आणखी वाचा...

 • 09:31 PM

  ठाणे परिवहनच्या बसला मुंब्रा येथील रेतीबंदर रोडवर आग, जीवितहानी नाही.

 • 09:13 PM

  औरंगाबाद : मोम्बत्ता तलावात बोटिंगसाठी पुन्हा निविदा काढणार

 • 08:47 PM

  कर्नाटक : कलबुर्गीमध्ये मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरल्याचे वृत्त.

 • 08:22 PM

  सेंच्युरियन कसोटीत स्लो ओव्हर रेटमुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दंड.

 • 08:09 PM

  नवी दिल्ली- हरियाणातल्या फरिदाबादेत 13 जानेवारी रोजी 22 वर्षांच्या मुलीवर करण्यात आलेल्या अत्याचार प्रकरणात राजस्थानमधून दोन जणांना अटक

 • 07:43 PM

  छत्तीसगड : सुकमा जिल्ह्यात सात नक्षलवाद्यांना अटक.

 • 07:24 PM

  नवी दिल्ली- सीए परीक्षेचा निकाल जाहीर, हरयाणाचा मोहित गुप्ता देशात पहिला, तर नवी दिल्लीतला प्रशांत देशात दुसरा

 • 07:08 PM

  गुजरात -इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू अहमदाबाद येथून मुंबईकडे रवाना

All post in लाइव न्यूज़

वृश्चिक

आज

१८ जानेवारी २०१८

आठवड्याचे भविष्य

नोकरी-व्यवसायात अडथळय़ांची शर्यत अनुभवाल. कामाच्या ठिकाणी झगडा चालू राहील. नियोजन व त्याचे अवलंबन करणो गरजेचे आहे. नोकरीच्या शोधात असल्यास यश मिळेल. नवी उमेद जागृत होईल. कामे झरझर हातावेगळी होतील. खोळंबलेली कामे मार्गी लागतील. कामानिमित्त दौरा होईल. अतिश्रमाने तब्येतीच्या तक्रारी उद्भवू शकतात. काळजी घ्या. नियमांची पायमल्ली होऊ देऊ नका. महत्वाच्या दस्तऐवजात किंवा आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.  वाढत्या खर्चाला आळा घाला. पूर्ण विचाराअंती सगळे निर्णय घ्या. विद्याथ्र्याच्या बौद्धिकतेला वाव मिळून चांगल्या गोष्टी निष्पन्न होतील. पण प्रत्येक टप्प्यावर खबरदारी घ्या. घरात जोडीदारासोबत जाणारा वेळ सुखद व लक्षात राहणारा असेल. इच्छाशक्ती उत्तम ठेवूनच कामाला लागा.
शुभदिनांक 17,18
 

मासिक भविष्य

नोकरीत पदोन्नती होऊन आवक वाढणार आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. नोकरीच्या शोधात असणा-या तरुणांची ओळखीतून कामे मार्गी लागतील. व्यावसायिक प्रदर्शने भरविता येतील. जून्या मिळालेल्या आॅर्डर्समध्ये वाढ झाल्यामुळे कामाचा विस्तार होईल. आपली सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. नावीण्यपूर्ण कलाकृतींचा ध्यास घ्याल. व्यवसाय वृद्धींगत करण्याच्यादृष्टीने मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली केल्या जातील. कामाच्या जबाबदाºया वाढतील. स्पर्धात्मक कार्यात आपण आघाडीवर राहणार आहात.व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. कोणाकडूनही आपले काम होईल अशी अपेक्षा बाळगू नका. स्वत:चे काम स्वत:च करावे. इच्छापूर्ती होईल.मित्रपरिवाराचे चांगले सहकार्य लाभेल. सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद घ्याल. गुंतवणूकीतून लाभ होतील. घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर आपला फायदा होईल. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. अष्टमातील गुरुमुळे अंधश्रदधेला बळी पडू नका. मन सैरभैर होणाºया घटना घडतील. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका. मधुमेह असणा-यांनी प्रकृतीची जास्त काळजी घ्यावी.

 

प्रमोटेड बातम्या