लाइव न्यूज़
 • 12:22 PM

  नवी दिल्ली - लोकसभेत टीडीपीने मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाल लोकसभा अध्यक्षांकडून मंजुरी.

 • 12:21 PM

  नवी दिल्ली - लोकसभेत विरोधकांकडून सरकारविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव दाखल.

 • 12:20 PM

  जालना : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचे 4 टँकर अडवले, टँकरमधील 4 हजार लिटर दूध रस्त्यावर सांडले

 • 11:59 AM

  माणिकराव ठाकरेंचा उपसभापतीपदाचा राजीनामा.

 • 11:56 AM

  पुणे : राम मंदिर व्हायलाच हवं, पण निवडणुकांसाठी त्याच भांडवल करता कामा नये - राज ठाकरे

 • 11:56 AM

  पुणे : NEET परीक्षेनंतर अॅडमिशनसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळायला हवं - राज ठाकरे

 • 11:53 AM

  पुणे : अमूलचं दूध महाराष्ट्रात आणण्यासाठी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं, दूध आंदोलनात राज्य सरकार दोषी - राज ठाकरे

 • 11:42 AM

  पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पत्रकार परिषद

 • 11:28 AM

  सोलापूर : शेळवे येथील तुकाराम सोपान गाजरे या शेतकऱ्याने शेततळ्यात दूध ओतले

 • 11:25 AM

  आंध्रे प्रदेशला विशेष दर्जा देण्याची टीडीपीची मागणी.

 • 11:23 AM

  नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गदारोळ, लोकसभेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी.

 • 10:12 AM

  चेन्नई : डीएमके पक्षाचे प्रमुख एम. करुणानिधी कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल.

 • 09:54 AM

  गोंदिया : गोंदियावरुन कामठा पांजरामार्गे आमगावकडे जाणारा दुधाचा टँकर पांगोली नदीत वाहून गेला

 • 09:50 AM

  स्वाभिमानी संघटनेचं आंदोलन अजून तीव्र होणार, उद्यापासून जनावरांसोबत महामार्ग रोखणार, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

 • 09:40 AM

  सोलापूर : बेगमपुर येथील नेचर डिलायटचे दुध संकलन केंद्र फोडले, 20 हजार लिटर दुधाच्या टाक्या रिकाम्या

All post in लाइव न्यूज़

धनु

आज

१८ जुलै २०१८

आठवड्याचे भविष्य

खूप प्रयत्न व संयम यांचा वापर करूनच वाटचाल करावी लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अति साहस टाळा. पण इतर ग्रहांच्या मदतीने कामाचा उत्साह असेल. बौध्दिक क्षेत्राला वाव मिळेल. मनासारख्या घटना घडण्याचा कालखंड. मोठे आर्थिक व्यवहार होऊन गुंतवणूक कराल. शेअर्स, लॉटरीसारख्या व्यवहारात फायदे होतील. पण प्रत्येक टप्प्यावर दक्ष राहावे लागेल. जास्त दगदग करू नका. शत्रू विरोधकांना जागीच थोपवून ठेवा. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तिंना चमकण्याची संधी. जोडीदाराच्या कलाने घ्यावे लागेल. विद्यार्थ्यांचा कला, साहित्यातील आवड वाढीस लागेल. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. एकंदरीत अधिक परिश्रमाची गरज भासेल. सर्दी-पडसे होण्याची शक्यता.
शुभदिनांक ३,४
 

मासिक भविष्य


सरकार दरबारी रेंगाळलेली कार्य पूर्ण होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आपण केलेल्या कार्याची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल.नोकरीत स्त्री सहकाऱ्याकडून योग्य सल्ला मिळेल. व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी करत असलेल्या आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोलाचे सहकार्य केले जाईल. आपली सामाजिक पत उंचावेल. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेल. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल. कुटुंबातील वडिलधाऱ्या व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी वाटेल. महिन्याच्या उत्तरार्धात विवाहेच्छुक तरुणांचे परिचङ्मोत्तर विवाह होतील. भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ केले जातील. कवी, कलाकार, गायक, वादक यांना आपल्या क्षेत्रात चांगल्या संधी लाभतील. तूळेतील मंगळ अनुकूल फलदायी ठरेल. अनपेक्षित धनलाभ होतील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. प्रकृतीच्या तक्रारी वाढतील. पाठदुखी, पोटदुखी यांचा त्रास होण्याची शक्यता राहते. अ‍ॅसिडीटी, उष्णतेचे विकार यासारख्या व्याधींपासून त्रास संभवतो. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका. आत्मोन्नतीचा मार्ग सापडेल. सूचक स्वप्ने पडतील. अंध:श्रद्धेला मात्र बळी पडू नका. 

प्रमोटेड बातम्या