लाइव न्यूज़
 • 11:50 AM

  1 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे, पद्मावती चित्रपट रिलीज होऊ देणार नाही - राजपूत करणी सेना अध्यक्ष लोकेंद्र सिंह.

 • 11:49 AM

  सोलापूरमध्ये रयत क्रांती संघटना आणि मनसेच्या वतीने मुंडन आंदोलन करुन सहकारमंत्र्यांचा केला निषेध.

 • 11:41 AM

  बीड - औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आष्टी शहरातील 23 दुकानांचे अतिक्रमण आज काढणार, शहरात मोठा पोलिस बंदोबस्त.

 • 11:40 AM

  जळगाव- मुंबईकडे जाणा-या 12142 पाटली पुत्र एक्सप्रेसच्या S-7 या प्रवासी डब्याच्या बोगीची फ्रेम क्रॅक झाल्याचे शनिवारी सकाळी १०.३० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकात आढळून आले.

 • 11:37 AM

  येत्या 21 नोव्हेंबरला कोपर्डी खटल्याचा अंतिम निकाल येणार आहे.

 • 11:29 AM

  अहमदनगर - कोपर्डी खटल्याचे कामकाज सुरू, आरोपींवरील दोष सिद्ध.

 • 11:18 AM

  सोलापूर - मनसेच्या वतीने ऊसदर मागणीसाठी मुंडन आंदोलन सुरू.

 • 11:06 AM

  चंदिगडमध्ये 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार.

 • 11:05 AM

  आज मुंबईत पेट्रोलचा भाव 76 रुपये 67 पैसे, तर डिझेलचा भाव 60 रुपये 96 पैसे.

 • 11:04 AM

  अहमदनगर - कोपर्डी बलात्काराचा आज निकाल, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम कोर्टात पोहोचले, थोड्याच वेळात सुनावणी.

 • 10:33 AM

  पंजाब फिरोझपूर येथून 22 किलो हेरॉईन जप्त केले, एक पिस्तुलही जप्त करण्यात आले आहे.

 • 10:31 AM

  चंदीगडमध्ये 21 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 • 10:00 AM

  कोल्हापूर - दिल्ली येथे अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने सोमवारी होण्या-या देशव्यापी आंदोलन साठी कोल्हापुरातून खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी बांधव छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास

 • 09:57 AM

  अहमदनगर - कोपर्डी खटल्यातील आरोपींना न्यायालयात आणलं, पोलिसांचा चोख बंदोबस्त, बॉम्बशोधक पथकाने केली परिसराची तपासणी. आणखी वाचा...

 • 09:26 AM

  अहमदनगर - कोपर्डी खटल्यातील आरोपींना न्यायालयात आणलं, सुनावणी पूर्ण झाली असून आज जिल्हा न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे.

All post in लाइव न्यूज़

धनु

आज

१८ नोव्हेंबर २०१७

आठवड्याचे भविष्य

चंद्रभ्रमणामुळे अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. गोड बोलून आपली कामे करुन घेण्यात यश येईल. वडिलधा:या व्यक्तींच्या सहकार्याने मोठे निर्णय घेणो शक्य होईल. विश्वास आणि प्रामाणिकपणाने प्रय} केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. मनातील कल्पना आकारात  घेतील. परदेशातील भावंडांशी सल्लामसलत करुन महत्वाचे निर्णय घेतले जातील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. कुटुंबात सुसंवाद साधलात तरच आपला निभाव लागणार आहे. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होतील.  कौटुंबिक सौख्य लाभेल. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटी होतील. विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक क्षेत्रत चांगली प्रगती साधता येईल. पूर्वनियोजित प्रवासात काही कारणाने बदल करावे लागतील. खेळाडूंना चांगल्या संधी लाभतील. 

शुभदिनांक 14,15

मासिक भविष्य

नवनवीन कल्पना आकार घेतील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. उत्साहवर्धक घटना घडल्याने तरुण-तरुणी आनंदात राहतील. नवीन ओळखी होतील. धाडसी निर्णय घेतले जातील.  एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनुकूल व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश येईल. आपल्या कार्यक्षेत्रतून प्रशिक्षणासाठी आपली निवड केली जाईल. वरीष्ठांकडून आपल्या कामाची प्रशंसा होईल. भविष्यकाळाच्यादृष्टीने आर्थिक तजवीज करणो शक्य होईल. मोठी आर्थिक उलाढाल केली जाईल. भावाबहिणींशी वागताना भावनिक उद्रेक होणार नाही याची दक्षता घ्या. जवळचे प्रवास सुखकर होतील. सामाजिक, राजकीय क्षेत्रतील व्यक्तींच्या बोलण्याचा चांगला प्रभाव टाकणारा आहे. तरुणांना सुसंधीचा लाभ मिळेल. भरपूर काम करायचे आणि गृहसौख्याचा आस्वाद घ्यावयाचा असे मनोमन ठरवाल. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. गृहउद्योगातून हाती पैसा येईल. एखाद्या गोष्टीबद्दल जास्त वेळ विचार करायची सवय लागल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लागेल. उत्तरार्धात व्यवसाय, उद्योगातून आपली आवक वाढेल. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. लेखक, साहित्यिक, कवी, कलाकार, वकील, संपादक यांच्यासाठी या महिन्यातील ग्रहमान अनुकूल राहील. आपल्यावर जोडीदाराच्या मतांचा पगडा राहील. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल.

प्रमोटेड बातम्या