लाइव न्यूज़

All post in लाइव न्यूज़

मीन

आज

१९ मार्च २०१८

आठवड्याचे भविष्य

आठवडय़ाची सुरुवात उत्साहात व आनंदाने होईल. कार्यक्षेत्रत प्रगती पथावर असाल. समाजात मान मान्यतेचे योग. नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन कामामुळे चैतन्य वाढेल. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. लेखन-प्रकाशन क्षेत्रत चांगले यश मिळेल. नवीन पुस्तके प्रकाशित होतील. नव लेखकांना नवीन संधी मिळेल. मात्र घरात कुरबुरी सुरु असतील. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. वडिलोपार्जित हक्कावरून नातेवाईकांमध्ये वादविवाद होण्याची शक्यता. सावध राहा. संततीविषयी काळजी राहील. मित्र व सहकाऱ्याकडून मात्र चांगले सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास केल्यास वाहने हळू चालवा. पार्टनरशिपच्या व्यवसायात अडथळे येऊन बंद पडण्याची दाट शक्यता. हितशत्रूंवर मात करता येईल. आरोग्यास जपावे.
शुभदिनांक 22,23

मासिक भविष्य

घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर आपला फायदा होईल. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. व्यावसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. आपल्या इच्छा आकांक्षांची पूर्तता होईल.  गुंतवणूकीतून लाभ होतील. वयस्कर व्यक्तींच्या गरजांसाठी पैसा खर्च केला जाईल. प्रवासात आपले खिसापाकिट सांभाळा. आरोग्याच्या जुन्या तक्रारी डोकेवर काढतील. नेत्रविकार, उष्णतेचे विकार यांच्यापासून त्रस होण्याची शक्यता आहे. अनावश्यक प्रवास टाळणो हिताचे आहे. महिलांनी कुवतीबाहेरील कामे टाळावी. कर्तव्यभावना जागृक ठेवून कामाची आखणी केली जाईल. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. आपली कल्पनाशक्ती व क्षमता याचा स्वत:लाच अंदाज आल्यामुळे काम करण्यास हुरुप येईल. आपल्या कामाच्या पूर्ततेसाठी दुस:यांवर अवलंबून राहू नका. परक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रत प्रगती होईल. काही अविस्मरणीय घटना घडण्याची शक्यता आहे.

प्रमोटेड बातम्या