लाइव न्यूज़
 • 08:15 AM

  डोक्यातून काढला सर्वांत मोठा ट्युमर, वजन १.८ किलोग्रॅम; नायर रुग्णालयात शस्त्रक्रिया आणखी वाचा...

 • 07:17 AM

  नवी दिल्ली - नोकरदार वर्गाला मोठा धक्का, पीएफवरील व्याजदरात मोठी कपात, 8.65 वरुन 8.55 टक्क्यांवर

 • 06:14 AM

  मुंबई : गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल गुरुवार(दि.२२) मुंबईला भेट देणार आहेत. सायंकाळी ४ वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुंबई काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमशी संवाद साधणार आहेत.

 • 12:51 AM

  दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेचा भारतावर सहा गड्यांनी विजय, मालिकेत 1-1 बरोबरी

 • 12:30 AM

  हार्दिक पांड्यानं मिलरला स्वस्तात केलं बाद, आफ्रिकेला चौथा धक्का. आफ्रिकेला विजयासाठी 31 चंडूत 48 धांवाची गरज

 • 12:21 AM

  उनाडकडने केला हेन्रिक क्लासेनचा अडथळा दूर, हेन्रिक क्लासेनची 30 चेंडूत 69 धावांची झंझावाती खेळी.

 • 11:45 PM

  टी -20 : दक्षिण आफ्रिकेच्या सहा षटकात दोन बाद 50 धावा.

 • 11:06 PM

  टी -20 : भारताचे दक्षिण आफ्रिकेला 189 धावांचे आव्हान, भारताच्या 20 षटकांत 4 बाद 188 धावा.

 • 10:57 PM

  पुण्याचे माजी महापौर माऊली शिरवळकर यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन.

 • 10:25 PM

  यवतमाळ : माहूर- पांढरकवडा एसटी बस झाडावर आदळली, चार प्रवासी गंभीर जखमी, पांढरकवडा तालुक्याच्या रुंझा येथील घटना.

 • 10:19 PM

  सेंच्युरियन टी 20: भारताच्या 10.2 षटकात तीन बाद 86 धावा.

 • 09:07 PM

  विंचूर (नाशिक)- :  येथून जवळच असलेल्या मानोरी फाट्याजवळील गांगुर्डे वस्तीजवळ दुचाकी व ट्रँक्टर यांच्यात झालेल्या अपघातात भारतीय लष्कराच्या सेवेत असलेला जवान ठार झाला.

 • 08:34 PM

  गडचिरोली - महिलांनी उद्ध्वस्त केले मोहाफूल दारूचे अड्डे, बचत गटांच्या महिलांचा पुढाकार

 • 07:55 PM

  पुणे- बाळासाहेबांनी कधी जात पाहिली नाही, तर त्या व्यक्तीचं कर्तृत्व पाहिलं- शरद पवार

 • 07:53 PM

  पुणे- महापुरुषांना जातीच्या माध्यमातून का पाहिलं जातं- राज ठाकरे

All post in लाइव न्यूज़

मीन

आज

२२ फेब्रुवारी २०१८

आठवड्याचे भविष्य

कार्यक्षेत्रत जास्त मेहनत घेणो अथवा प्रयत्न करणे गरजेचे आहे. जबाबदारी वाढेल. शत्रू-विरोधकांचा त्रस जाणवेल. भावनांना-विचारांना काबूत ठेवा. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीनुसार कामाच्या ठिकाणी आशादायी काळ असला तरी वरिष्ठांची मर्जी संपादन करावी लागेल. त्यांना गृहीत धरून चालणार नाही ‘हांजी’ ची भूमिका वाढवावी लागेल. अन्यथा आपले वैयक्तिक रिपोर्टस खराब होऊ शकतात. घरात आनंदी वातावरण असेल. आपल्या बुद्धिला चालना द्या. वैवाहिक जोडीदाराची नाराजी बसू शकेल. त्यामुळे मानसिक-शारिरीक कष्ट होतील. पण गुरूकृपेने त्यावर मात करू शकाल. वारसाहक्काने मिळणा:या लाभात अडचणी येऊ शकतात. पण जीभेवर साखरपेरणी करावी लागेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नेम करणं व तो पाळणो असे केल्यास यश संभवते.

शुभदिनांक 23,24

मासिक भविष्य

आरोग्यासंबंधी तक्ररी उद्भवतील. यंत्र-श ापासून धोका संभवतो प्रवासात आपले खिसापाकिट सांभाळा. आपल्या कार्यक्षेत्रतील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मनाचा उत्साह कमी पडण्याची शक्यता आहे. ज्या लोकांमुळे तुम्ही अडचणीत येता, अशा लोकांपासून आज लांब रहा. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रय} करेल. लांबच्या प्रवासाला जाण्यापूर्वीच काही अडथळे येतील. घरातील दुर्लक्षित कामांकडे वेळीच लक्ष द्या. आपल्या जोडीदाराच्या मतांचा पगडा राहील. आपल्या मतांचा आदर केला जाईल.  प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तू, महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळावेत. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. वयस्कर व्यक्तींच्या गरजांसाठी पैसा खर्च केला जाईल. व्यापार-व्यवसायात नफा होईल. मात्र तात्पुरत्या स्वरुपात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. चांगल्या व्यक्तींची भेट होईल.  उत्तरार्धात स्थावरातून लाभ होतील. कवी, कलाकारांना अनुकूल काळ आहे. शुभसमारंभात सहभागी व्हाल. जिभेवर साखर व डोक्यावर बर्फ ठेवून आपली कामे सहजतेने मार्गी लागतील.सार्वजनिक संबंधाच्या प्रश्नांशी सतत संबंध येतील. त्यातूनच समाजात नांवलौकिक वाढेल. महत्वाचे निर्णयात योग्य व्यक्तिचे मार्गदर्शन लाभेल. नोकरीत बदल करु इच्छिणा:या तरुणांना यशोमार्ग लाभेल. भागीदारीत व्यवसाय करणा:या व्यावसायिकांनी मात्र सतर्कतेने निर्णय़ घेणो गरजेचे आहे.5

प्रमोटेड बातम्या