लाइव न्यूज़

All post in लाइव न्यूज़

तुळ

आज

१९ मार्च २०१८

आठवड्याचे भविष्य

आपल्या कर्तृत्वाला उजाळा मिळून कार्यक्षेत्रत अग्रेसर राहाल. पराक्रमाला उत्तेजन मिळेल. जीवनाला कलाटणी मिळेल. नोकरी-धंद्यात प्रतिष्ठित व्यक्तिंकडून संपर्क वाढेल. संशोधनात्मक काम हाती घ्याल. परंतु वैयक्तिक स्तरावर धास्तावलेली मानसिकता राहील. मरगळ टाका. कामात अधिक लक्ष द्या. सहका:यांशी मैत्रीपूर्ण संबंध असतील. विरोधकांवर मात करणो सहज शक्य असेल. मनोबल वाढविण्यासाठी आत्मविश्वासात वाढ करा. घरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असेल. धार्मिक कारणानिमित्त पाहुण्यांची वर्दळ वाढेल. विद्यार्थी स्वत:च्या बुध्दिच्या जोरावर प्रगती साधतील व यश खेचून आणतील. परदेशी जाण्याची संधी उपलब्ध होईल. तब्येतीस जपा. कायद्याचे पालन करा.
शुभदिनांक 20,21

मासिक भविष्य

धाडसी निर्णय घेतले जातील, मात्र अवाजवी साहस टाळावे. अंगी धडाडी येईल. कर्तुत्वशक्ती वाढेल्याने धाडसी कामे कराल. नोकरीत अधिकार व सत्ता वाढेल. राजकीय कार्यकत्र्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील.  वाहन-वास्तूचे आपले प्रश्न मार्गी लागतील. नवीन उपक्रम राबविण्यात यश येईल. विश्वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. मनातील कल्पना आकारात  घेतील. उत्तरार्धात हितशत्रूंच्या कारवायांना मोठय़ा युक्तीवादाने सामोरे जावे लागेल. मातुल घराण्यासंबंधी जिव्हाळा वाटेल. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील.  नोकरीत बदल करु इच्छिणा:या तरुणांना यशोमार्ग लाभेल. जोडीदाराशी सुसंवाद साधावा लागेल. दैनंदिन  जीवनातून  विश्रंतीसाठी जरा बदल करण्याची आवश्यकता वाटेल. आपली क्षमता व अमर्याद कल्पनाशक्तीची आपणांस कल्पना येईल. उष्णतेचे विकार, संसर्गजन्य विकार यांपासून त्रस होण्याची शक्यता राहाते. न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. थोरा-मोठय़ांच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कर्जप्रकरणो मंजूर होतील. कौटुंबिक जबाबदा:या पार पाडाल. सतत सुवार्ता कानी येतील.
 

प्रमोटेड बातम्या