लाइव न्यूज़

All post in लाइव न्यूज़

सिंह

आज

१९ मार्च २०१८

आठवड्याचे भविष्य

आपला राजयोगकारक ग्रह उत्तम प्रशासनात्मक काम कराल; कार्यप्रवण व्हाल. कर्तृत्व दाखवून शत्रू विरोधकांना नामोहरम कराल. कामानिमित्त प्रवास कराल. प्रवासात काळजी घ्या. व्यसने-प्रलोभने टाळा. स्वत:चे म्हणणो इतरांवर लादू नका. विद्याथ्र्याना शुभ काळ पण परीक्षा चालू असल्यामुळे गाफील राहू नका. अतिआत्मविश्वास घातक ठरू शकतो. वाहन अथवा घराच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णत्वास जातील पण असे व्यवहार सावधानतेने करावे. योग्य-अयोग्याची खातरजमा करावी. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी लागेल. ‘होयबा’ची भूमिका निभावणो इष्ट ठरेल. व्यापार उद्योगाची सूत्रे जमतील. अशा गोष्टीना धार्मिक अध्यात्मिक कार्याची जोड दिल्यास दुग्धशर्करा योगाचे फायदे घेऊ शकाल; लाभ घ्या.
शुभदिनांक 22,23

मासिक भविष्य

नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. व्यावसायिक भाग्य बीजे पेरली जातील. नोकरीत आपल्या अधिकार कक्षेत वाढ होईल. प्रतिष्ठीत बडय़ा व्यक्तींचे सहकार्य लाभेल.प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. महत्वाचे निर्णय घेताना त्यातील तज्ज्ञ व्य¨क्तचे मार्गदर्शन घ्यावे.  आपल्या सहका:यांचे सहकार्य मोलाचे ठरेल. मित्रपरिवाराबरोबर करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रतून आपली प्रशंसा केली जाईल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. सामाजिक क्षेत्रतील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल. आपली प्रतिमा डागाळणार नाही याकडे विशेष लक्ष द्या.  नवीन उपक्रम राबविण्याचे तूर्त पुढे ढकलावे. नवीन व्यावसायिक करार केले तरी त्यांचा अवलंब सध्या टाळावा. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. आध्यात्मिक विषयांवर हातून लिखाण होईल. जोडधंद्यातून लाभ होतील. नाविण्यपूर्ण कलाकृती मन मोहून घेतील. रचनात्मक कार्यक्रमातून लाभ होतील. विद्याथ्र्याना उच्च शिक्षणासाठी स्पर्धा परीक्षा देऊन यश मिळेल. नवनवीन कल्पना आकार घेतील. 
 

प्रमोटेड बातम्या