लाइव न्यूज़

All post in लाइव न्यूज़

मिथुन

आज

१९ मार्च २०१८

आठवड्याचे भविष्य

प्रयत्नांची शिकस्त करून आक्रमक व स्पर्धात्मक ग्रहमान यश खेचून आणतील. मान-मरातब मिळेल. पण सावधानता बाळगावी लागेल. आपल्या बालसुलभ स्वभावाचा फायदा सहकारी घेऊन शिरजोरी होण्याची शक्यता. कामासाठी परदेशवारी घडू शकेल. आर्थिक नियोजन अवश्य करा. गर्भवती महिलांनी अवाजवी कृत्ये करू नयेत, स्वत:ला जपावे. सरकारी नोकरदार वर्गाला शुभ कालावधी. त्या क्षेत्रतले अंदाज अचूक ठरतील. कौटुंबिक कार्यानिमित्त वा परिवारासोबत तीर्थयात्रेचे योग. दान-धर्म कराल. विद्याथ्र्यानी आता चालू असलेल्या परिक्षांच्या काळात आळस झटकून एकाग्रता साधावी. विवाह उत्सुकांचे विवाह जुळून येतील. थोरा-मोठय़ांच्या ओळखीने कार्यसिद्धी यशसिध्दी अनुभवाल.
शुभदिनांक 18,19

मासिक भविष्य

पुढे घडणा:या घटनांची आपल्याला चाहूल लागेल. धार्मिक - आध्यात्मिक प्रगती साधता येईल. सत्कार्यासाठी प्रवास घडून येतील. संतसज्जनांचा सहवास लाभेल.  तीव्र इच्छाशक्ती  व प्रगल्भ विचारसरणी यांतून आपल्या अडचणींवर सहजपणो मात कराल. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. आर्थिक आवक वाढेल.नावीण्यपूर्ण घडामोडी घडतील.भविष्यकाळाच्यादृष्टीने आर्थिक तजवीज करणो शक्य होईल. मोठी आर्थिक उलाढाल केली जाईल. सामाजिक क्षेत्रतील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. पण त्याकडे दुर्लक्ष करा. मन सैरभैर होईल. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. विद्याथ्र्याना उच्च शिक्षणासाठी स्पर्धा परीक्षा देऊन यश मिळेल. नवनवीन कल्पना आकार घेतील. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. संततीशी वागताना भावनिक उद्रेक होणार नाही याची दक्षता घ्या. जवळच्या प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. प्रलोभनातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता राहते. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल.  बढती -बदलीसाठी नोकरीत केलेल्या प्रयत्नांना यश येईल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील.
 

प्रमोटेड बातम्या