लाइव न्यूज़
 • 08:10 AM

  पाकिस्तानच्या सैनिकांनी भारताच्या 30 चौक्यांवर गोळीबार, भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर. चार दहशतवाद्यांचा खात्मा

 • 08:02 AM

  मुंबई : भिवंडीतील बाबला कम्पाऊंड परिसरातील कारखान्याला लागली आग. शुक्रवारी (20 जानेवारी)रात्रीची घटना. कोणतीही जीवितहानी नाही.

 • 08:00 AM

  राजस्थान: 'पद्मावत' चित्रपटाच्या विरूद्ध २१ जानेवारीला म्हणजेच उद्या चित्तौडगढमध्ये राजपूत समाज उतरणार रस्त्यावर

 • 07:54 AM

  आसाम : कोक्राझार येथे पहाटे 5.20 सुमारास भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता 5.2 रिश्टर स्केल एवढी होती.

 • 11:14 PM

  त्रिपुरा : सीपीआयएम आणि बीजेपी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, दोन जण जखमी.

 • 11:03 PM

  नवी दिल्ली - वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुदीप लखटाकिया यांची नॅशनल सिक्‍युरिटी गार्डच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 • 09:58 PM

  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय

 • 09:43 PM

  मध्य प्रदेशच्या राज्यपाल म्हणून गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 • 09:42 PM

  दिल्लीहून गुवाहाटीला १६० प्रवासी घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला पक्षाची धडक.

 • 09:05 PM

  पुणे - सरपोतदार केटरर्स आणि पुणा गेस्ट हाऊसचे मालक चारुकाका सरपोतदार यांचे निधन

 • 08:55 PM

  दिल्ली येथून गुवाहाटीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला पक्ष्याची धडक, 160 प्रवासी करत होते विमानातून प्रवास

 • 08:48 PM

  श्रीनगर : सुंदरबन येथे पाकिस्तानने केेलेल्या गोळीबारात बीएसएफ जवान शहीद झाल्याचं वृत्त.

 • 07:34 PM

  केरळ: कन्नूर जिल्ह्यात अभाविप कार्यकर्त्याची हत्या झाल्याचे वृत्त. पोलीस तपास सुरू.

 • 07:25 PM

  आंध्रप्रदेश - आठ वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक.

 • 07:10 PM

  दिल्ली: 'आप'च्या २० आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार.

All post in लाइव न्यूज़

मिथुन

आज

२० जानेवारी २०१८

आठवड्याचे भविष्य

या सप्ताहात काहीसा अडचणीतून प्रवास करावा लागेल. तडजोडीने मार्ग स्वीकारा. वरिष्ठांशी मतभेद टाळा. हुशारी व कर्तबगारीने आपले उपक्रम चालू ठेवता येतील. आर्थिक आवक मात्र मनासारखी असेल. घरात कुरबुरी चालू असतील. वाद जास्त ताणू नयेत. प्रलोभने-व्यसने टाळा. बौद्धिक गोष्टींना चांगला वाव मिळून यश व कार्यसिद्धी प्राप्त कराल. विद्याथ्र्यानी संयमाचे धोरण अवलंबावे, एकाग्रता साधावी लागेल; नव्या परिचयाचा लाभ घेता येईल. वेळ वाया घालवू नका. मित्रंचा सहवास लाभेल. पण शत्रू-मित्र भेद ओळखा. प्रकृतीकडे लक्ष द्या. तिळाचे लाडू जास्त खाऊन उष्णतेचे विकार संभवू शकतात.
शुभदिनांक 15,16

मासिक भविष्य

त्रिकोणयोग आपल्या बुद्धीकौशल्याची चांगली चुणूक दाखविणारा राहील. लेखक, साहित्यिक, संपादक, प्रकाशक तसेच विविध भाषांचा अभ्यास करणा-या तरुणांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. वाचनाचा तसेच लेखनाचा व्यासंग वाढेल. स्पर्धापरीक्षांतून चांगले यश प्राप्त होईल. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. सरकारी अधिकारी, पोलिस खाते यांत काम करणाºया व्यक्तींसाठी अनुकूल फलदायी आहे. वातविकारांपासून शारिरीक त्रास दर्शवतो. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. कुटुंबात वादंग निर्माण होतील. गृहउद्योेग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. व्यवसायत उद्योगातून चांगली प्राप्ती होईल. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता महिला इलेक्टॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी करतील. आपले काम दुसºयावर सोपवू नका. पत्नीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. एकमताने निर्णय घ्याल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. आर्थिक आवक वाढेल. भागीदारी व्यवसायातून आपणांस चांगला फायदा होईल. नवीन रचनात्मक कलाकृतींचा ध्यास घ्याल. मोठ्या प्रमाणावर तूर्त गुंतवणूक करु नका.

प्रमोटेड बातम्या