लाइव न्यूज़
 • 05:17 AM

  मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने गुरुवारी, १८ जानेवारी रोजी वाशी बोर्डावर धडक मोर्चाची हाक दिली आहे.

 • 11:23 PM

  भिवंडी -  30 मुलांना अन्नातून विषबाधा, पाच जण गंभीर. उपचारासाठी 24 जणांना मुंबईतील नायर रुग्णालायत दाखल करण्यात आलं आहे. पाच जणांवर खाजगी रूग्णालयात तर एकावर इंदिरागांधी रूग्णालयांत उपचार सुरु. 

 • 10:53 PM

  नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठ ते दिंडोरी टोल नाका दरम्यान चारचाकीतून आलेल्या संशयितांनी चार चाकीवर केला गोळीबार

 • 10:48 PM

  भिवंडी - भिवंडीत मदरसा मधील मुलांना विषबाधा, १५ मुलांवर प्राथमिक उपचार करून त्यांना आज रात्री ९-३०वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केले दाखल

 • 10:45 PM

  गुजरातच्या समुद्र किना-याजवळ एमटी जेनेसा तेलवाहू जहाजाला आग लागली. जहाजावर 30,000 टन तेल असल्याचे नौदलाच्या प्रवक्ताने सांगितले.

 • 10:17 PM

  मुंबई : इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहून मुंबईत दाखल झाले असून त्यांचे स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 • 09:56 PM

  मध्य रेल्वेच्या सर्व लोकलमध्ये लागणार सीसीटीव्ही, २७६ कोटींच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाची मंजूरी आणखी वाचा...

 • 09:31 PM

  ठाणे परिवहनच्या बसला मुंब्रा येथील रेतीबंदर रोडवर आग, जीवितहानी नाही.

 • 09:13 PM

  औरंगाबाद : मोम्बत्ता तलावात बोटिंगसाठी पुन्हा निविदा काढणार

 • 08:47 PM

  कर्नाटक : कलबुर्गीमध्ये मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरल्याचे वृत्त.

 • 08:22 PM

  सेंच्युरियन कसोटीत स्लो ओव्हर रेटमुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दंड.

 • 08:09 PM

  नवी दिल्ली- हरियाणातल्या फरिदाबादेत 13 जानेवारी रोजी 22 वर्षांच्या मुलीवर करण्यात आलेल्या अत्याचार प्रकरणात राजस्थानमधून दोन जणांना अटक

 • 07:43 PM

  छत्तीसगड : सुकमा जिल्ह्यात सात नक्षलवाद्यांना अटक.

 • 07:24 PM

  नवी दिल्ली- सीए परीक्षेचा निकाल जाहीर, हरयाणाचा मोहित गुप्ता देशात पहिला, तर नवी दिल्लीतला प्रशांत देशात दुसरा

 • 07:08 PM

  गुजरात -इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू अहमदाबाद येथून मुंबईकडे रवाना

All post in लाइव न्यूज़

मकर

आज

१८ जानेवारी २०१८

आठवड्याचे भविष्य

या आठवडय़ात एकंदरीत संघर्षातून कर्तृत्वास उजाळा मिळेल. नोकर मंडळी डोके वर काढतील. परंतु तुमच्या चिकाटीने काम करण्याच्या सवयीमुळे त्यावर मात कराल. मानसिक संतुलन राखणो गरजेचे आहे. कौटुंबिक स्तरावर घरात धार्मिक मंगल कार्याची नांदी असेल. तिर्थयात्रेनिमित्त प्रवासाचे आयोजन कराल. अलौकिक आनंद घ्याल. जोडीदाराशी एकोप्याने व सल्लामसलतीने पुढील वाटचाल कराल; त्यांची मदत मोलाची ठरेल. आपल्या कार्याची मात्र गुप्तता पाळावी लागेल. वकिली व्यावसायिक अथवा पत्रकारांना शुभ कालावधी. पण निष्काळजीपणा घातक ठरू शकतो. हुशारीने कृती करून कार्यभाग साधा. महिलावर्गाचा कल चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे असेल, संक्रांतीनिमित्त वाण लुटण्याचा आनंद घेतील.
शुभदिनांक 17,18
 

मासिक भविष्य

या महिन्यातील ग्रहमान आपणांस अतिशय अनुकूल फलदायी आहे. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश लाभणार आहे. महत्वाचे दस्तऐवज हाती लागतील. आपल्याला अपेक्षित गोष्टी घडल्यामुळे आनंद मिळेल. ज्या बातमीची आपण वाट बघत होता ती बातमी लवकरच आपल्या कानी येईल. कवि, कलाकारांना सुसंधी देणारा काळ आहे. राशीत आलेल्या शुक्रामुळे हौसेमौजेखातर खर्च कराल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. व्यावसायिक प्रदर्शनातून फायदा होईल. नशिबाची साथ लाभेल. उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढविणाºया घटना घडतील. सांसारिक जीवनात आनंद देणाºया घटना घडतील. अचानक सहलीचे आयोजन केले जाईल. स्थावर मालमत्तेचे रेंगाळलेले व्यवहार मार्गी लागतील. तरुणांना हा महिना अत्यंत शुभफलदायी राहील. आत्मविश्वास व मनोबल उत्तम राहील. रंग, फर्निचर तसेच मौल्यवान वस्तूंचे व्यापारी वर्गासाठी शुक्रभ्रमण अनुकूल फलदायी ठरेल. उद्योग व्यवसायात मोठ्या प्रमाणात उलाढाल केली जाईल. आत्मपरीक्षणाचा आपल्याला खूप फायदा होईल. आपल्या मतांचा आदर केला जाईल. विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षांतून विशेष यशप्राप्ती लाभेल. चांगल्या शैक्षणिक संधी प्राप्त होतील. सत्संग लाभेल. दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल.

प्रमोटेड बातम्या