लाइव न्यूज़
 • 10:31 AM

  तळेगाव येथील अपघातात प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू. एक निरीक्षक ठार तर उप संचालकासह दोन जण जखमी.

 • 10:23 AM

  पद्मावती 1 डिसेंबरला यूकेमध्ये होणार प्रदर्शित, ब्रिटीश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशनचा पद्मावती चित्रपटाला हिरवा कंदिल.

 • 10:23 AM

  जळगाव- शहरात आज मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहीमेचा शुभारंभ .डॉक्टर तात्याराव लहाने यांची उपस्थिती.

 • 09:10 AM

  डोंबिवली-विठलवाडी स्थानका दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत.

 • 08:39 AM

  जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात, भरधाव कारने ट्रकला मागून दिलेल्या धडकेत इन्कम टॅक्स अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू.

 • 08:10 AM

  लुधियानामध्ये फॅक्टरीला लागलेल्या आग प्रकरणात मालक इंद्रजीत गोलाला पोलिसांनी केली अटक, या आगीत होरपळून 13 जणांचा मृत्यू झाला.

 • 07:51 AM

  पद्मुमन हत्या प्रकरणात अटक झालेला बस कंडक्टर अशोक काल रात्री हरयाणातल्या घरी पोहोचला.

 • 07:12 AM

  नवी दिल्ली- राजधानीत धुरक्यामुळे 17 एक्स्प्रेस ट्रेन उशिरानं, 6 ट्रेनचं वेळापत्रक बदललं, एक ट्रेन केली रद्द

 • 07:09 AM

  कैरो: लिबिया सीमेजवळ शस्त्रांची तस्करी करणा-या 10 वाहनांना बुधवारी रात्री उशिरा इजिप्तच्या वायुदलाने हल्ला करून केलं नष्ट, सैन्य प्रवक्त्याचा दावा

 • 11:22 PM

  तामिळनाडू - चेन्नईच्या सत्यभामा युनिव्हर्सिटीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या.

 • 11:01 PM

  पिंपरी : रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव खूनप्रकरणी चार आरोपींना 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी.

 • 11:00 PM

  इम्मर्सन म्नांगवा होणार झिम्बाब्वेचे नवे राष्ट्रपती, शुक्रवारी घेणार शपथ

 • 10:38 PM

  मुंबई : सिद्धार्थ नगर गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्वसन कामाबाबत चुकीची माहिती देणाऱ्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 • 09:53 PM

  हैदराबाद: सहा अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी 85 वर्षीय वृद्धावर गुन्हा.

 • 09:24 PM

  औरंगाबाद : हिवाळी अधिवेशनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामुळे काँग्रेसची कापूस दिंडी तूर्तास रद्द

All post in लाइव न्यूज़

मकर

आज

२३ नोव्हेंबर २०१७

आठवड्याचे भविष्य

चंद्रभ्रमणामुळे आठवडय़ाच्या सुरुवातीला घरातील दुर्लक्षित कामांना वेळ देता येईल. गृहउद्योगातून नवीन कार्यारंभ केले जातील.  कौटुंबिक सौख्य लाभेल.  घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन वस्तूंची खरेदी होईल. आगंतुकपाहुणो येण्याची शक्यता राहते. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटी होतील. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. व्यावसायिक प्रदर्शनातून फायदा होईल. नशिबाची साथ लाभेल. नवीन कल्पना आकार घेतील. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. सतत  शुभशकुनांचा सतत प्रत्यय येईल. गुरुची कृपा आपल्या प्रयत्नांना यश देईल. व्यवसायात उद्योगात पूर्वी केलेल्या  गुंतवणूकीतून चांगला लाभ होईल. बौद्धीक व कला क्षेत्रतून चांगला फायदा होईल. 

शुभदिनांक 24,25

मासिक भविष्य

खर्चाला नवनवीन वाटा फुटतील. चैनीखातर खर्च वाढता राहणार आहे. सहलीचे बेत आखले जातील. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. सामाजिक, राजकीय क्षेत्रतील व्यक्तींच्या बोलण्याचा चांगला प्रभाव टाकणारा आहे. तरुणांना सुसंधीचा लाभ मिळेल. सरकार दरबारी असलेली कामे विनासायास मार्गी लागतील. कामाचे चांगले नियोजन कराल.  नव्या योजनांची अंमलबजावणी यशस्वी होईल. आपल्या हाताखालच्या व्यक्तींना चुचकारुन कामे करुन घ्याल.  कामाचे पूर्वनियोजन महत्त्वाचे राहील. व्यवसायात अभिनव तंत्र वापरल्यामुळे यश येईल. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत  प्रय}शील राहाल. आपल्या बुद्घीचातुर्यावर मोठी मजल माराल. रचनात्मक कामातून लाभ होतील. धाडसी निर्णय घेतले जातील. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्या दूराग्रही स्वभावाला आळा घालावा.  विचाराताली चांगले बदल तुमची इच्छाशक्ती वाढविण्यास मदत करतील. विद्याथ्र्याना शैक्षणिक उत्कर्ष साधता येईल. संशोधनपर अभ्यासक्रमातून चांगले यश संभवते. आपले ध्येय गाठण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.

प्रमोटेड बातम्या