लाइव न्यूज़

All post in लाइव न्यूज़

कर्क

आज

१९ मार्च २०१८

आठवड्याचे भविष्य

कार्यक्षेत्रत गोंधळाचे वातावरण असण्याची शक्यता. पराक्रमात वाढ होऊन, जोडीदाराची योग्य साथ मिळून वाटचाल सुकर असेल. नोकरी-व्यवसायानिमित्त दूर जाण्याचे योग. वरिष्ठांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात परंतु जबाबदारीपूर्वक व कुशलतेने आपले काम चालू असल्याने वरिष्ठ खुश होतील. वैद्यक क्षेत्रतल्या व्यावसायिकांना सुगीचा काळ असेल. घरात कुरबुरी चालू असतील आर्थिक आवक चांगली असेल. स्त्रियांनी मानसिक स्वास्थ्य सांभाळावे; शुभवार्ता कानी पडतील. मित्रपरिवारात नावलौकिकता मिळवाल. संततीचे नाजूक प्रश्न सामंजस्याने मिटतील. काळजी करू नये. काही अनिष्टतता वाटल्यास येणा:या काळात मार्गी लागेल.
शुभदिनांक 20,21

मासिक भविष्य

विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. कुटुंबात सुसंवाद साधलात तरच आपला निभाव लागणार आहे. आकर्षक इलेक्ट्रॉनिक्सच्या  वस्तूंची खरेदी कराल. भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ केले जातील.व्यवसाय वृद्धींगत करण्याच्यादृष्टीने मोठय़ा प्रमाणावर आर्थिक उलाढाली केल्या जातील. इच्छापूर्ती होईल. जनसंपर्कातून लाभ होतील. कवी, कलाकार, गायक, वादक यांना चांगल्या संधी लाभतील. लेखक, साहित्यिकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. नोकरीत आपले तत्व सोडून कोणतेही काम करु नका. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रत प्रगती होईल. संतसज्जनांचा सहवास लाभेल.अनोळखी माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील.  कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. भविष्यकाळाच्यादृष्टीने आर्थिक तजवीज करणो शक्य होईल. मोठी आर्थिक उलाढाल केली जाईल. आपले ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रम कराल. नोकरीच्या शोधात असणा-या तरुणांची ओळखीतून कामे मार्गी लागतील. व्यावसायिक प्रदर्शने भरविता येतील. उद्योग व्यापारात नवीन काही प्रकल्प, योजना करण्यास चांगला काळ आहे. अनुकूल घडामोडी घडतील. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल.पूर्वनियोजित कामात बदल करावे लागतील.

प्रमोटेड बातम्या