लाइव न्यूज़
 • 08:08 AM

  नवी मुंबई - हॉस्पिटलमधील संगणक यंत्रणेवर सायबर हल्ला, वाशीच्या एमजीएम हॉस्पिटलमधील घटना.

 • 07:52 AM

  मुंबई : माटुंगा रेल्वे स्थानकाला जोडणारा पादचारी पूल बंद, पुलाला तडा गेल्यानं पूल बंद ठेवण्याचा निर्णय

 • 07:36 AM

  खा. राजू शेट्टी अजूनही पालघरला ठाण मांडून, गुजरातहून येणारं दूध रोखण्यासाठी आंदोलन

 • 07:35 AM

  कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली.

 • 07:34 AM

  कोल्हापूर : शिरोळ येथे जनतारा शाळेजवळ आंदोलनकर्त्यांनी 20 दूधाचे कॅन रस्त्यावर ओतले.

 • 07:25 AM

  कोल्हापुरात दूध आंदोलनाला हिंसक वळण, जयसिंगपुरात गोकुळ दूध संघाचा टँकर पेटवला

 • 07:07 AM

  गुजरात- भरूचमध्ये काल रात्री इमारत कोसळून एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

 • 03:20 AM

  ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्या, ढिगा-याखालून दोन जणांचे मृतदेह काढले बाहेर

 • 11:18 PM

  स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मुंबई-अहमदाबाद राज्य महामार्गावरील महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील भिलाड येथे गुजरातवरून दूध घेऊन मुंबईकडे निघालेले 50 टँकर अडवून ठेवले

 • 11:14 PM

  ठाणे - पाचपाखाडी भागातील सिद्धेश्वर तलाव परिसरातील जलकुंभाला जोडण्यात आलेली जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

 • 10:24 PM

  मुंबई : 19 जुलै पासून एल्फिन्स्टन स्थानकच नाव 'प्रभादेवी' होणार

 • 10:18 PM

  काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, दिग्गजांची सुट्टी ; राहुल गांधींनी 22 जुलै रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे.

 • 10:11 PM

  India vs England 3rd ODI LIVE : 14 षटकानंतर इंग्लंडच्या दोन बाद 96 धावा

 • 09:06 PM

  सातारा : सातारा-कास रस्त्यावर पॉवर हाऊसनजीक मंगळवारी रात्री दरड कोसळली. या दरडीवर असणारे झाडही उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला

 • 08:28 PM

  गुजरात: राजकोट परिसरात मुसळधार पाऊस; रेल्वे वाहतूक विस्कळीत

All post in लाइव न्यूज़

मेष

आज

१८ जुलै २०१८

आठवड्याचे भविष्य

नोकरी व्यवसायात चढउतार जाणवतील. आपल्यात असलेला उत्साह अंगलट येण्याचा संभव. त्यामुळे निर्णय घेणे फार अवघड जाईल. पण पूर्ण विचाराअंतीच वागणे योग्य. वडीलधाऱ्यांचा सल्ला अवश्य घ्या. पारिवारीक कलहालासुध्दा सामोरे जावे लागेल. हितशत्रूंकडून बाधा येण्याची शक्यता. जोडीदाराशी सलोखा ठेवा. छोट्या-छोट्या कारणांनी ताणून धरू नका. संततीचे मात्र खेळात, अभ्यासात प्राबल्य जाणवेल. संतसज्जनांसोबत तीर्थयात्रेला जाण्याची संधी मिळेल. प्रवासात वाहने सावकाश चालवा. विद्यार्थ्यांच्या, कलाकारांच्या कलाविष्काराला वाव मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फायदा संभवतो. जनसंपर्क चांगला राहील. लेखकांना प्रसिध्दी व पैसा असा दुहेरी लाभ होण्याची शक्यता.
शुभदिनांक १८,१९

मासिक भविष्य

ग्रहस्थितीमुळे आपले मन विचलित होईल. निर्णय घेणे कठीण होईल. तापटपणा वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासी सुसंवाद साधलात तरच आपला निभाव लागणार आहे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. उतावीळपणाने कोणतेही कार्य करु नये. जबाबदारीची कार्ये स्वीकारताना आपल्या हातून पूर्ण होणार असतील तरच स्वीकारावीत, अथवा तूर्त कोणतीही जबाबदारी स्वीकारु नये.  लेखक, कवी यांना सुसंधी लाभतील. प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. भावंडांच्या भेटी होतील. गुरुमुळे घरातील वातावरण आनंदी राहील. घरात धार्मिक शु•ासङ्कारं•ााचे आयोजन केले जाईल. गृहसुशोभीकरणासाठी आकर्षक, शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. व्यवसाय उद्योगात आपले काम सहायकांवर सोपविताना त्या कामात जातीने लक्ष घालणे आवश्यक आहे.  विरोधकांच्या कारवायांवर मात कराल. नवनवीन उपक्रम राबविले जातील. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल. शेजारी व जवळच्या नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध राहतील. धाडसी निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.  दैनंदिन कामाच्या पद्घतीत केलेला थोडासा बदल सुखावह ठरेल. कामाचे चांगले नियोजन कराल. सरकारदरबारी रेंगाळलेली कामे मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागतील. 

प्रमोटेड बातम्या