लाइव न्यूज़

All post in लाइव न्यूज़

कुंभ

आज

१९ मार्च २०१८

आठवड्याचे भविष्य

आपल्या मेहनतीचे चीज झालेले दिसेल. बुध्दिच्या जोरावर आपण कार्यक्षेत्रत बाजी मारू शकता. आर्थिक स्थिरस्थावरता लाभेल. कौटुंबिक कटकटींना दूर ठेवा. शैक्षणिक क्षेत्रत कार्यरत असलेल्यांना स्पर्धामध्ये यशप्राप्ती. पण सतर्क राहा. अध्यात्मिक गोष्टीत मन रमवाल. त्यासाठी तिर्थयात्र, दान-धर्म कराल. संतांच्या सहवासाचा मार्गदर्शनाचा लाभ घ्याल. घरात वडिलधा:यांच्या आरोग्याची जोपासना करा. आर्थिक व्यवहारात दक्ष राहावे लागेल. प्रामाणिकपणोच पैशाचा व्यवहार करावा. अस्मितेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. कलाकार-खेळाडना अनुकूल काल असून स्पर्धेत पुरस्काराचे मानकरी ठरतील. विवाहोत्सुकांसाठी अनुकूल काळ आहे. विद्याथ्र्याना परीक्षेत चांगले यश लाभेल. भावंडांविषयी चिंता उत्पन्न होईल. 
शुभदिनांक 20,21
 

मासिक भविष्य

सामाजिक, राजकीय क्षेत्रतील व्यक्तींच्या बोलण्याचा चांगला प्रभाव टाकणारा आहे. तरुणांना सुसंधीचा लाभ मिळेल. आपल्याला मताचा समाजात आदर होईल. आपले ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक गोष्टीची चर्चा करण्यापेक्षाकृती करण्याची गरज आहे. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकाराल. एखादी शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे हायसे वाटेल. कर्तव्यभावना जागृक ठेवून कामाची आखणी केली जाईल. नव्या आशा पल्लवीत होतील. आपल्या हाताखालच्या व्यक्तींना चुचकारुन कामे करुन घ्याल.  व्यवसाय वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने नवीन ओळखींचा फायदा करुन घ्याल. विद्याथ्र्याना शैक्षणिक उत्कर्ष साधता येईल. संशोधनपर अभ्यासक्रमातून चांगले यश संभवते. दैनंदिन कामाच्या पद्घतीत केलेला थोडासा बदल सुखावह ठरेल. कामाचे चांगले नियोजन कराल. व्यवसायात जवळच्या नातेवाईकांना सहभागी करून घेणो शक्य असेल तर जरूर करा. नव्या कामाचा प्रस्ताव येईल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. आपली सामाजिक प्रतिमा उंचावेल अशी खरेदी केली जाईल. जुने मित्र भेटतील त्यांच्या बरोबर आनंद लुटण्याचे क्षण येतील. करमणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल. ज्या बातमीची अगदी अतुरतेने वाट पाहात होतात ती समजल्यामुळे आपल्या उत्साहाला उधाण येईल.

प्रमोटेड बातम्या