कामगारांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 10:43 PM2017-09-20T22:43:15+5:302017-09-20T22:43:41+5:30

आशिया खंडात दुसºया स्थानावर असलेल्या फिनले मीलच्या चारशेहून अधिक कामगारांनी मंगळवारी सकाळी ९ वाजतापासून संप पुकारला.

Workers Elgar | कामगारांचा एल्गार

कामगारांचा एल्गार

Next
ठळक मुद्दे१२ तास आंदोलन : फिनले मिल प्रशासनाची हुकूमशाही चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : आशिया खंडात दुसºया स्थानावर असलेल्या फिनले मीलच्या चारशेहून अधिक कामगारांनी मंगळवारी सकाळी ९ वाजतापासून संप पुकारला. पाच कामगार बेमुदत उपोषणावर बसले आहेत. तब्बल १२ तासांनंतर मील प्रशासनाने दखल घेत आंदोलकांना आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
अचलपूर येथील फिनले मील प्रशासनाकडून कामगारांच्या वेतनाचा मुद्दा प्रलंबित आहे. त्याची पिळवणूक सुरू असून त्यांची नेमणूक कायमस्वरूपी व्हावी, यासाठी २४० दिवस काम करावे लागते. मात्र, प्रशासनाकडून २४० दिवस होऊ दिले जात नाहीत. त्यांना बिनपगारी सुटीवर पाठविले जाते. दुसºया विभागातील कामगाराकडे पदभार देऊन अन्याय केला जातो, अशी तक्रार कामगारांची आहे. यामुळे न्याय मिळावा, यासाठी कामगारांनी मील प्रशासनाविरुद्ध मंगळवारी आंदोलनाचा बडगा उगारला. चारशेहून अधिक कामगार रस्त्यावर उतरले. काही कामगारांनी मिल प्रशासनासोबत छुपा करार करून अन्य कामगारांवर अन्याय केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संघटनेमध्ये दुफळी असल्याने त्याचा फायदा मील प्रशासन घेत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
११ तासानंतर आली जाग
फिनले मील प्रशासनाने कामगारांचे आंदोलन सुरूअसताना त्याची दखल घेतली नाही. दुपारच्या वेळेत कामगारांनी मिलमध्ये न जाता आंदोलन अधिक तीव्र केल्याने मील प्रशासनात खळबळ उडाली. अखेर रात्री साडेअकरा वाजता आंदोलकांची समजूत काढीत आश्वासन देण्यात आले. त्यामुळे तब्बल १२ तासांनंतर मील कामगारांनी आंदोलन मागे घेतले.
संघटनेवर अन्याय
फिनले मीलमध्ये भाजपाप्रणित सर्वाधिक कामगार आहेत. मात्र मील प्रशासनाने दुसºया संघटनेशी छुपा व कमी वेतनाचा करार केला केंद्र्रात व राज्यात भाजपाची सत्ता असताना या सत्ताधारी संघटनेला बाजूला ठेवण्यात आले गिरणी कामगार संघ संलग्नित भारतीय मजदूर संघाने केंद्र शासनाच्या वेतनाची मागणी करीत करार करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर कायमस्वरूपी तोडगा अजूनपर्यंत निघाला नाही. मंगळवारी धनंजय लव्हाळे,अमोल पारवे, संदीप मांडलेकर अंकित सदार, अक्षय भमोरे, सुनील कावरे, संघपाल शेंगोकार आदी कामगारांनी एल्गार पुकारला.

Web Title: Workers Elgar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.