‘ईव्हीएम’ला उन्हाची बाधा होईल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 01:16 AM2019-04-14T01:16:40+5:302019-04-14T01:17:08+5:30

पहिल्या टप्प्यात काही मतदान केंद्रांवरील ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी उद्भवल्यात. त्यामुळे सध्या विदर्भात असलेली ‘हीट वेव्ह’ ईव्हीएमला बाधक आहे काय, अशी चर्चा यावेळी चांगलीच चर्चेत आली. मात्र, निवडणूक विभागाने ही बाब नाकारलीे.

Will EVM interfere with the heat? | ‘ईव्हीएम’ला उन्हाची बाधा होईल काय?

‘ईव्हीएम’ला उन्हाची बाधा होईल काय?

Next
ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात काही ठिकाणी बंदच्या तक्रारी : ‘झोनल’कडे २० टक्के राखीव मशीन

गजानन मोहोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पहिल्या टप्प्यात काही मतदान केंद्रांवरील ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी उद्भवल्यात. त्यामुळे सध्या विदर्भात असलेली ‘हीट वेव्ह’ ईव्हीएमला बाधक आहे काय, अशी चर्चा यावेळी चांगलीच चर्चेत आली. मात्र, निवडणूक विभागाने ही बाब नाकारलीे. पाच टक्के ईव्हीएम बंद पडण्याची शक्यता गृहित धरून झोनल अधिकाऱ्याकडे राखीव मशीन ठेवण्यात येणार आहेत. प्रखर प्रकाश या मशीनवर पडू नये, यासाठी काळजी घेण्याच्या सूचना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे या विभागाने सांगितले.
लोकशाहीच्या महाउत्सवात मतदार अन् मतदान या दोन्ही बाबी लोकशाहीच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे या प्रक्रियेतील प्रत्येक बाबीची आयोगाकडून विशेष काळजी घेतली जाते. पहिल्या टप्प्यातील निवडणूक दोन दिवसांपूर्वी पार पडल्या. यावेळी नागपूर व वर्धा मतदारसंघात काही मतदान केंद्रांवरील ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे सध्या सुरू असलेली ‘हीट वेव्ह’ ईव्हीएमला बाधक आहे काय, याबबत मतदारांनी शंका व्यक्त केली. या सर्व ठिकाणी झोनल अधिकाºयांद्वारे तात्काळ मशीन पुरविण्यात आल्यात, तर काही ठिकाणी व्हीव्हीपॅट बंद पडल्याच्यादेखील तक्रारी आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात हा प्रकार काहीअंशी झाल्याने दुसºया टप्प्यासाठी आयोगाकडून काही सूचना आहेत काय, अशी विचारणा उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांनी केली असता, त्यांनी ईव्हीएम सर्व वातावरणात फिट आहेत; किंबहुना या मशीनची ४८ अंश तापमान असलेल्या राजस्थानमधील जैसलमेर येथील निवडणुकीत यशस्वी चाचणी झाल्याचे सांगितले गेले.
व्हीव्हीपॅटदेखील काही ठिकाणी बंद पडल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, हे मेकॉनिकल डिव्हाइस आहे. यामध्ये काही दोष उद्भवल्यास सर्व झोनल अधिकाºयांना २० ते ३० टक्के व्हीव्हीपॅट राखीव दिलेले आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेत कुठलाही खोळंबा येणार नाही, असे पाटील यांनी सांगितले. व्हीव्हीपॅटची वाहतूक करतांना घ्यावयाच्या काळजीबाबत प्रशिक्षणादरम्यान सांगण्यात आले व अखेरपर्यंत याबाबत संबंधितांना सूचना देणार असल्याचे पाटील म्हणाले.

व्हीव्हीपॅटचा ‘नॉब’ आडवा असावा
आयोगाने शनिवारी दिलेल्या सूचनेनुसार मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅटची वाहतूक करताना या मशीनचा नॉब हा आडवा ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. वास्तविक, मतदान प्रक्रियेच्या वेळी व्हीव्हीपॅटचा नॉब हा उभा असतो. मतदानाची प्रक्रिया झाल्यावर या यंत्राची बॅटरी काढावी लागते, अन्यथा लीक होण्याची शक्यता आहे. याविषयीच्या सूचना अधिकारी-कर्मचाºयांना देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

मतदान केंद्रांवर एलईडीचा प्रकाश
ईव्हीएमला प्रखर प्रकाश बाधक असल्याने मतदान केंद्रावर फोकस किंवा प्रखर प्रकाशाचे दिवे लावण्याऐवजी सौम्य असलेले एलईडी लार्ईट लावण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.

Web Title: Will EVM interfere with the heat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.