एका वाघनखाच्या शोधात वनाधिकारी, वन्यप्राण्यांचे अवशेष जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 05:48 PM2019-01-13T17:48:31+5:302019-01-13T17:48:50+5:30

पूर्वमेळघाट वनविभागाचे वनअधिकारी वाघाच्या एका नखाच्या शोधात असून, यात सात आरोपींव्यतिरिक्त दोन बडे मासे अडकणार असल्याची माहिती हाती लागली आहे

wildlife body part were seized | एका वाघनखाच्या शोधात वनाधिकारी, वन्यप्राण्यांचे अवशेष जप्त

एका वाघनखाच्या शोधात वनाधिकारी, वन्यप्राण्यांचे अवशेष जप्त

Next

- अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : पूर्वमेळघाट वनविभागाचे वनअधिकारी वाघाच्या एका नखाच्या शोधात असून, यात सात आरोपींव्यतिरिक्त दोन बडे मासे अडकणार असल्याची माहिती हाती लागली आहे.

या वाघनखं, दात प्रकरणात वनअधिकाºयांनी आरोपींकडून मोराचा पाय, सायळचे काटे, खवल्या मांजराची खवली, वाघाची हाड आणि घोरपड व अजगर सापाच्या चरबीपासून बनवलेले तेल जप्त केले आहे. वाघाप्रमाणेच हे सर्व प्राणी शेड्यूल वनमध्ये येतात. यात वाघाची हाडे गावच्या पोलीस पाटलाकडून ताब्यात घेण्यात आली आहेत. वाघाची एकूण आठ नखे, तीन दात वनविभागाने हस्तगत केली असली तरी एका नखाच्या शोधात वनाधिकारी आहेत. आरोपींनी नऊ वाघनखांची कबुली दिली आहे. 

व्याघ्र प्रकल्पाच्या बंदरकहू कॅम्पवरील दोन चौकीदारांना अटक करण्यात आली आहे. व्याघ्र प्रकल्पांतर्गत अतिसंवेदनशील क्षेत्रातील ही घटना असली तरी संबंधित वाघ मेल्याची, गायब झाल्याची माहिती व्याघ्र प्रकल्पाकडे नाही. वन कर्मचाºयांच्या गस्ती अहवालात तसा उल्लेख नाही. याबाबत कुठेही वनगुन्ह्याची नोंद नाही. यामुळे वनकर्मचाºयांचे गस्ती अहवाल आणि वनाधिकाºयांचा टूर डायºया संशयास्पद ठरत आहेत. 

वाघ मरतात, कुजतात
व्याघ्र प्रकल्पासह प्रादेशिक वनपरिक्षेत्रात वाघ मरतात, मारल्या जातात, सडतात, कुजतात याची माहिती बरेचदा वनअधिकाºयांना नसते. दफ्तरी त्याची नोंदही मिळत नाही. माहिती मिळालीच तर ती आठ ते दहा दिवसांनी किंवा दहा ते पंधरा दिवसांनी मिळते आणि मग नाकाला रूमाल लावून त्याचा पंचनामा उरकविल्या जातो. ओढताढ करीत त्याच्या अंगावर लाकडं टाकून मग जाळल्या जाते. हे मेळघाटच्या वाघाचे दुर्दैव्य. जंगलाच्या राजाच्या राजाला मेल्यानंतर ना सलामी ना काही.

समन्वयाचा अभाव, सीबीआयकडे तपास
मेळघाटात एकामागून एक वाघ मरत आहेत. मारल्या जात आहेत. याचा उलगडाही होत आहे. पण यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व प्रादेशिक वनविभागाचे कर्मचारी, अधिकारी यांच्यात समन्वय नाही. चौकशीत एकमेकाला सहकार्य नाही आणि तेही आपसात मदत घेत नाहीत. दरम्यान, या घटनांची सीबीआयमार्फत चौकशी केली जावी, असे मत व्यक्त होत आहे. 

हम भी आपसे कम नहीं
पूर्व मेळघाट वनविभागांतर्गंत अंजनगाव वनपरिक्षेत्रातील गिरगुटी परिसरात पाचपेक्षा अधिक वाघ मारल्या गेलेत. याची जाणीव व्याघ्र प्रकल्प अधिकाºयांनी पूर्व मेळघाट वनविभागाला करून दिली. या अनुषंगाने दीड महिन्यांपासून पूर्व मेळघाट वनविभागाचे अधिकारी तपास करीत आहेत. पण, गिरगुटी प्रकरणात त्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. दरम्यान, मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत मेलेल्या वाघाची वाघनखं, दात, हाडे जप्त करून आरोपींना अटक करून पूर्व मेळघाट वनविभागाने ‘हम भी आपसे कम नहीं’ हे व्याघ्र प्रकल्पाला दाखवून दिले. यात आपल्याकडेही वाघ मरतात. पण, आपल्यालाही त्याची माहिती नसते याची जाणीव पूर्व मेळघाट वनविभागाने व्याघ्र प्रकल्प अधिकाºयांना करून दिली.

२००५ मध्ये मनमोहनसिंग पंतप्रधान असताना राजस्थानमधील सरीस्का व्याघ्र प्रकल्पातील वाघांची चौकशी सीबीआयकडे दिली होती. २००९ मध्येही भंडारा, चंद्रपूर कडील वाघांच्या शिकारींची चौकशी सीबीआयकडून करण्यात आली होती. तर वाघाला प्रत्येक पायाला चार असे एकूण १६ मोठी नखे असतात. प्रत्येक पायाच्या अंगठ्यालगतचे नख लहान असते.
- जयंत वडतकर,
मानद वन्यजीव रक्षक, अमरावती

Web Title: wildlife body part were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.