ठळक मुद्देपीडब्ल्यूडी दावणीला : कार्बन मोनॉक्साईडचे जीवघेणे उत्सर्जन, दोन महिन्यांपासून नागरिकांचा छळ

गणेश देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरवासीयांचा अंत पाहणाºया येथील शिवाजीनगर ते बडनेºयापर्यंतच्या 'हाय-प्रोफाईल' सिमेंट रस्त्याच्या कामामुळे आधीच महिनाभरापासून वैतागलेल्या अमरावतीकरांना आता राजरोसपणे श्वसनाचे आजार प्रदान केले जात आहेत.
मुंबईच्या जेपीई कंस्ट्रक्शन कंपनीकडे या रस्त्याच्या निर्मितीचे कंत्राट आहे. कामाचे मूल्य ८३.५५ कोटी रुपये आहे. काम दर्जेदार आणि जलदगतीने व्हावे यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरण्यात येत आहे. अत्यंत वर्दळीचे रस्ते अडवून महिनोगिनती लांबविले जाणारे हे काम ढिसाळ नियोजनाचा ज्वलंत नमुना ठरले आहे.

जीवघेणे प्रदूषण आणि कणाहीन अधिकारी
संबंधित कामावर मंगळवारी दिवसभर जनरेटर चालविण्यात आले. हे जनरेटर १०० मीटर परिघातील लोकांच्या कानठाळ्या बसाव्यात इतका कर्कष आवात करीत होते. अशा ध्वनीप्रदूषणासोबत अत्यंत गंंभीर पातळीचे वायुप्रदूषणही हे जनरेटर करीत होते. सोबतचे छायाचित्र बघून त्याबाबतची कल्पना येऊ शकेल. रंगहीन वा पांढºया रंगाचा वायू हा कार्बन मोनॉक्साईड असतो. आरोग्यासाठी धोकादायक मानल्या जाणाºया काळ्या रंगाच्या कार्बन डायआॅक्साडच्या तुलनेत हा वायू अधिक घातक आहे. हा विषारी वायू मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जात होता. अभियंता असलेले-तगडे वेतन घेणारे; पण कणा नसलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना ही बाब जराही खटकली नाही. दोन महिन्यांपासून नागरिकांना धूलिकण सेवन करावे लागत आहेत, ते वेगळेच!

जनरेटर उत्सर्जित वायूने ५०० लोकांचा मृत्यू
अमेरिकेत कार्बन मोनॉक्साईडच्या विपरित प्रभावावर एक अभ्यास जाहीर करण्यात आला. त्यानुसार, घराबाहेर ठेवल्या जाणाºया लहान आकाराच्या जनरेटरमधून उत्सर्जित होणाºया या वायुमुळे सन २००५ पासून २०१३ पर्यंत ५०० लोकांचे मृत्यू झालेत. दरवर्षी २० हजारपेक्षा अधिक नागरिकांना इमर्जन्सी वैद्यकीय सेवा त्यामुळे घ्यावी लागते. ४००० पेक्षा अधिक लोकांना इस्पितळात दाखल व्हावे लागते. हा अभ्यास ज्या जनरेटर्सवर आधारित होता ते अमेरिकेतील होते. अर्थात ते अत्यंत कमी प्रमाणात विषारी वायू सोडणारे होते. हे जनरेटर भारतातील आहे. जुने आहे. विषारी वायू सोडण्यासाठीच निर्माण केले असावे, अशा ताकदीने वायू सोडणारे आहे. त्यामुळे मनुष्यआरोग्याची किती भयंकर हानी होत असावी?

प्रदूषण नियंत्रण मंडळ करणार काय कारवाई?
वायूप्रदूषण रोखण्यासाठी राजधानी दिल्लीत रान उठले असताना अमरावतीत मुद्दामहून विषारी वायू वातावरणात सोडला जातो. येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तरीही शांतच असतात. पंतप्रधानांच्या 'स्वच्छ भारत'ला राजरोसपणे खो दिला जात असतानाही प्रदूषणकर्त्यांवर कारवाई केली जाणार नाही काय?

जनरेटर असावे असे आम्ही सुचविले होते; तथापि असे प्रदूषण केले जात असेल तर त्यासंबंधी दखल घेतली जाईल.
- विवेक साळवे, अधीक्षक अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग

विजेसाठी आम्ही भीक मागावी काय? अशा दर्जाचे काम यापूर्वी अमरावतीने बघितले तरी काय? बांधकाम विभाग विजेची सोय करून देत नाही.
- राजेश लांबे, व्यवस्थापक, जेपीई.

कार्बन मोनॉक्साईड हा वायू मानवी आरोग्यासाठी विषारी असतो. त्याच्या सततच्या सेवनाने श्वसनासंबंधीचे गंभीर आजार उद्भवू शकतात.
- डॉ.अतुल यादगिरे, अमरावती


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.