पश्चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरमध्ये खरीप, पेरणीपूर्व मशागतींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 05:29 PM2019-06-20T17:29:32+5:302019-06-20T17:29:47+5:30

रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे यंदा खरिपाच्या पेरणी शनिवारपासून सुरू होणाºया आर्द्रा नक्षत्रात होणार आहे.

In western Vidarbha 32 lakh hectares of kharip Crop | पश्चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरमध्ये खरीप, पेरणीपूर्व मशागतींना वेग

पश्चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरमध्ये खरीप, पेरणीपूर्व मशागतींना वेग

googlenewsNext

अमरावती - रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे यंदा खरिपाच्या पेरणी शनिवारपासून सुरू होणाºया आर्द्रा नक्षत्रात होणार आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती पाण्यात जलविहार करणार, असा शेतक-यांचा अंदाज आहे. हवामानतज्ज्ञांनीही २५ जूनपासून मान्सून व-हाडात सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली आहे. सध्या शिवारात पेरणीपूर्व मशागतींना वेग आलेला आहे. यंदा ३१ लाख ६४ हजार ४१८ हेक्टरमध्ये खरिपाची पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

गतवर्षीचा खरीप सरासरीपेक्षा २४ टक्के कमी पावसामुळे बाधित झाला. यंदा १२ ते १५ जून दरम्यान मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र, अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मान्सूनची गती मंदावली, आता तो राज्यात प्रवेशित झाल्यामुळे शेतकºयांमध्ये उत्साह संचारला असून, शेतशिवारात कामांची लगबग सुरू झालेली आहे. यंदाच्या खरिपासाठी अमरावती जिल्ह्यात ७,२८,११२ हेक्टर, बुलडाणा ६,६५,५९६, अकोला ४,८२,६२०, वाशिम ३,९९,६६९ व यवतमाळ जिल्ह्यात ८,८८,४२१ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. पावसाने आणखी १० ते १५ दिवस दांडी मारल्यास मूग व उडदाचे पेरणीक्षेत्र सोयाबीन व कपाशीत रूपांतरित होणार आहे.

यंदा सर्वाधिक १३,६४,८०४ हेक्टरमध्ये सोयाबीनचे क्षेत्र राहणार आहे. यामध्ये सर्वाधिक ३,७५०४६ हेक्टर क्षेत्र बुलडाणा जिल्ह्यात राहील, अकोला १,११,६१०, वाशीम २,८३,१३७, अमरावती ३,२३,३०० व यवतमाळ जिल्ह्यात २,७२,७११ हेक्टर राहणार आहे. संकरित कपाशीचे यंदा ९,६९,०५७ हेक्टर  व सुधारित कपाशीचे १७,५३१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. संकरित ज्वार १,४४,५१८ हेक्टर, संकरित बाजरा २,००८ हेक्टर, मका १९,३०३ हेक्टर, तूर ४,२९,८९८ हेक्टर, मूग १,३३,८२७, उडीद ६४,५३६ हेक्टर, भुईमूग १,६४८ हेक्टर, सूर्यफूल ६,७२९ हेक्टर, तीळ ४८७३ हेक्टर तसेच धान व इतर पिकांचे ५,५८९ हेक्टर क्षेत्र राहणार आहे.

यंदा ६,४०,४६० क्विंटल बियाण्यांची मागणी
 खरिपासाठी यंदा ६,४०,४६० क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी विभागाने नोंदविली आहे. यामध्ये ३,४८५ क्विंटल संकरित ज्वार, बाजरा २ क्विंटल, मका १००, तूर १०,५११, मूग २,२६९, उडीद ३,८९०, सूर्यफूल २, तीळ १३, सोयाबीन २,७८,७३०, संकरित कापूस २,७८,७३० व सुधारित कापसाचे १३ क्विंटल बियाणे लागणार आहेत. यंदा सार्वजनिक क्षेत्रातून ३,१८,०८९ क्विंटल खासगी ३,२२,३७१ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहेत. महाबीजद्वारा २,९९,५८९ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

खरिपासाठी ६,७४,१४० मे.टन खतांची मागणी
 यंदाच्या खरीप हंगामासाठी ६,७४,१४० मे.टन रासायनिक खतांची मागणी कृषी विभागाने नोंदविली आहे. यामध्ये युरिया २,१४,५०९ मे.टन, डीएपी १,०७,५३७, एमओपी ३९,४७१, एसएसपी १,०३,७९३ व कॉप्लेक्समध्ये २,०८,८२९ मे.टन खतांचा समावेश आहे. सद्यस्थितीत ५,५२,४७५ मे.टन खतांचे आवंटन आहे. यामध्ये युरिया १,८६,००० मे.टन, डीएपी ८०४१०, एमओपी ३४,४३५, एसएसपी ९१,२१० व कॉप्लेक्सेसमध्ये १,६०२४० मे.टन खतांचा समावेश आहे.

Web Title: In western Vidarbha 32 lakh hectares of kharip Crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.