आठवड्यात १५ कोटी वसुलीचे दिवास्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:48 PM2018-03-24T23:48:14+5:302018-03-24T23:48:14+5:30

आर्थिक वर्षे संपायला उणे-पुरे आठवडा शिल्लक असताना करवसुली अवघी ६८ टक्क्यांवर स्थिरावली. त्यामुळे प्रशासनाने आता मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, मोबाईल टॉवरधारकांसारखे बडे जप्तीच्या कारवाईनंतरही महापालिकेला जुमानत नसल्याचे चित्र आहे.

Weekday 15 crore recovery day | आठवड्यात १५ कोटी वसुलीचे दिवास्वप्न

आठवड्यात १५ कोटी वसुलीचे दिवास्वप्न

Next
ठळक मुद्दे३२ टक्के थकबाकी : यंत्रणा कामाला, समन्वयक अधिकाऱ्यांकडून आढावा

आॅनलाईन लोकमत
अमरावती : आर्थिक वर्षे संपायला उणे-पुरे आठवडा शिल्लक असताना करवसुली अवघी ६८ टक्क्यांवर स्थिरावली. त्यामुळे प्रशासनाने आता मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, मोबाईल टॉवरधारकांसारखे बडे जप्तीच्या कारवाईनंतरही महापालिकेला जुमानत नसल्याचे चित्र आहे.
मागील पंधरा दिवसांत महापालिकेने १५ पेक्षा अधिक मोबाईल टॉवर सील केलेत, पालिकेने कारवाई केली तथापि त्यांचेकडून कर वसूली होऊ शकली नाही, हे वास्तव आहे. उर्वरित आठवड्यात तब्बल १५ कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान कर यंत्रणेसमक्ष उभे ठाकले आहे. मात्र, दिवसाकाठी होणारी सरासरी २५ लाख रुपयांची वसुली पाहता १५ कोटी वसूल करणे महापालिकेसाठी दिवास्वप्न ठरण्याचे संकेत आहेत.
महापालिका आयुक्त हेमंत पवार हे वैद्यकीय रजेवर गेल्याचा परिणामही वसुलीवर झाला आहे.
४७.२२ कोटी रुपये एकूण मागणीच्या तुलनेत २३ मार्चपर्यंत मालमत्ता कराच्या रुपात ३२.१९ कोटी रुपये महसूल गोळा झाला. सहायक आयुक्त व सहायक क्षेत्रीय अधिकाºयांसह कर लिपिकांच्या साथीला आयुक्तांनी समन्वयक अधिकारी दिल्याने त्याचा सुपरिणाम करवसुलीवर झाल्याचेही वास्तव आहे. सरासरी २५ लाख रुपये रोजची वसुली झाल्यास या आठवड्यात १.७५ कोटी रुपयांची भर पडणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास ३१ मार्चअखेरची वसुली ३४ कोटींच्या घरात असेल.
गतवर्षी नोटबंदीचा फायदा होऊनही करवसुली ३०.३४ कोटी रुपयांवर स्थिरावली होती. गतवर्षीच्या तुलनेत मार्चच्या तिसºया आठवड्यातच सरासरी २ कोटी रुपयांची वाढ नोंदविली गेली. त्यामुळे हुरुप वाढलेली कर यंत्रणा नव्या जोमाने कामाला लागली आहे.
पाचही झोनमधील थकीत मालमत्ता जप्त करून त्यांची लिलाव प्रक्रिया आरंभली आहे. ३१ मार्चपर्यंत थकबाकी भरल्यास उर्वरित मालमत्तांचाही लिलाव करण्याची कठोर भूमिका प्रशासनाने घेतली आहे. शतप्रतिशत टॅक्स वसुलीसाठी ‘घर ते घर’ (हाऊस टू हाऊस) मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिकेच्या मालमत्ता कराच्या वसुलीचा आकडा वाढण्याऐवजी १५ कोटींवर गेलेला थकबाकीचा डोंगर सर करताना अधिकारी-कर्मचाºयांची दमछाक होत आहे. त्यामुळे मार्चअखेरीस मालमत्ता करवसुलीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वरिष्ठ अधिकाºयांना मोठी कसरत करावी लागणार आहे. मार्चअखेर उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांची जप्ती सुरू केली आहे. जप्त मालमत्तांवर पालिकेचे नाव लावून त्याचा लिलाव केला जात आहे.
थकबाकीबाबत बहुतांश नगरसेवक अनभिज्ञ
ज्या प्रभागातील करवसुली माघारली, त्या प्रभागाचे नेतृत्व करणाºया नगरसेवकांचे सहकार्य आयुक्तांनी मागितले होते. नगरसेवकांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता नागरिकांमध्ये मालमत्ता कर भरण्यासंदर्भात जनजागृती करावी, सहायक आयुक्त वा कर यंत्रणेतील अन्य कर्मचाºयांनी हाक दिल्यास त्याला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयुक्त हेमंत पवार यांनी केले होते. मात्र, दोन सहायक आयुक्तांचा अपवाद वगळता अन्य तिघांनी त्यासाठी नगरसेवकांना फारसे महत्त्व न दिल्याची ओरड आहे.

Web Title: Weekday 15 crore recovery day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.