लग्न समारंभ चोरांचे टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:25 PM2017-12-17T23:25:13+5:302017-12-17T23:26:54+5:30

लग्नसराईच्या धुमधामीचा गैरफायदा घेत आता चोरांनी लग्न समारंभांना लक्ष्य केले आहे.

Wedding Ceremony Targets thieves | लग्न समारंभ चोरांचे टार्गेट

लग्न समारंभ चोरांचे टार्गेट

Next
ठळक मुद्देसावधान ! : ३ लाखांचा ऐवज लंपास, सीसीटीव्हीत अल्पवयीन कैद

आॅनलाईन लोकमत
अमरावती : लग्नसराईच्या धुमधामीचा गैरफायदा घेत आता चोरांनी लग्न समारंभांना लक्ष्य केले आहे. शनिवारी रात्री दोन लग्नसमारंभाच्या कार्यक्रमामधून अल्पवयीन चोराने तब्बल २ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्यामुळे खळबळ उडाली. रंगोली पर्ल व खंडेलवाल लॉनमध्ये शनिवारी रात्री या चोरीच्या घटना उघड झाल्या असून एक अल्पवयीन चोर सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पोलीस सूत्रानुसार, स्वप्निल निरंजन सगणे (२७,रा. राधानगर) हे आतेभावाच्या रिसेप्शनसाठी खंडेलवाल लॉन येथे शनिवारी गेले होते. दरम्यान वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी ते स्टेजवर चढले. त्यांच्या बहिणीने जवळील बॅग खाली टेबलमागे ठेवून वधू-वरासोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांची बॅग लंपास झाली. त्यांच्या बॅगमधील दागिने, मोबाईल व रोख असा एकूण १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल अज्ञाताने लंपास केला. दुसरी घटना नवाथे नगर चौकातील रंगोली पर्लमध्ये घडली. श्रीरामनगरातील रहिवासी गिरीश रमेश इंगळे (३५) हे त्याच्या भावाच्या रिशेप्शनच्या कार्यक्रमात गेले होते. त्यांची आई माला इंगळे वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर गेल्या असता तेथे फोटोसेशन सुरू होते. त्यामुळे त्यांनी स्टेजवर बॅग ठेवली. दरम्यान अज्ञात चोराने स्टेजवर ठेवलेली बॅगी लंपास केली. सोबतच वधू-वराचे काही गिफ्टसुद्धा लंपास झाले. या बॅगमध्ये सोने व रोख असा एकूण १ लाख १८ हजारांचा मुद्देमाल होता. या घटनेची तक्रार गिरीश इंगळे यांनी राजापेठ पोलिसांकडे नोंदविली. दोन्ही चोरीच्या घटनांमुळे लग्न समारंभात प्रचंड खळबळ उडाली. दोन्ही तक्रारीवरून पोलिसांनी १२ ते १४ वयोगटातील अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पोलीस तपास करीत आहे.
एक अल्पयवीन सीसीटीव्हीत कैद
रंगोली पर्ल व खंडेलवाल लॉनमध्ये झालेल्या चोरीच्या घटनांचे राजापेठ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये एक अल्पयवीन मुलगा वधू-वराच्या खुर्चीमागे आढळून आला. त्याने बॅग पोबारा केल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट झाले. दोन्ही घटनांमध्ये एकसारखाचा मुलगा असल्याची पुष्टी पोलिसांनी केली. अल्पवयीनाच्या वर्णनावरून त्याचा शोध लागला.
दुसऱ्याच अल्पवयीनाला मारहाण
खंडेलवाल लॉनमध्ये चोरी झाल्याचे कळताच वऱ्हाड मंडळीत प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांसह लग्न वऱ्हाडातील काही नागरिकांनी सीसीटीव्हीत तपासले असता त्यात एक अल्पवयीन चोरी करताना आढळला. त्याचा शोध वऱ्हाडातील काही नागरिकांनी सुरू केला. एक संशयित सीसीटीव्हीत कैद झालेल्या अल्पवयीनसारखा दिसल्याने वऱ्हाडातील नागरिकांनी त्यालाच पकडून मारहाण केली. सुदैवाने वेळेवर राजापेठचे डीबी पथक घटनास्थळी पोहोचल्याने त्यांनी नागरिकांच्या तावडीतून त्या अल्पवयीनाला सोडविले. चौकशीअंती तो चोर नसल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Wedding Ceremony Targets thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.