वरूड, मोर्शीला दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 01:39 AM2019-07-22T01:39:41+5:302019-07-22T01:40:05+5:30

संपुर्ण जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असताना वरुड मोर्शीकडे मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. दोन्ही तालुक्यातील खरिपाची पिके हातची जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पहिली पेरणी मोडण्याच्या स्थितीत असल्याने दुबार पेरणीसाठी दमदार पाऊस हवा आहे.

Waiting for strong rain, Verd and Morshi | वरूड, मोर्शीला दमदार पावसाची प्रतीक्षा

वरूड, मोर्शीला दमदार पावसाची प्रतीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देसरासरी ३७ मिमी पाऊ स : खरीप पीक पेरणी उलटण्याची शक्यता, संत्रा बागा सुकल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड/मोर्शी : संपुर्ण जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असताना वरुड मोर्शीकडे मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. दोन्ही तालुक्यातील खरिपाची पिके हातची जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पहिली पेरणी मोडण्याच्या स्थितीत असल्याने दुबार पेरणीसाठी दमदार पाऊस हवा आहे.
अत्यल्प पर्जन्यमानामुळे दोन्ही तालुक्यावर कपाशी व सोयाबिनच्या दुबार पेरणी करावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या मते एकूण ६० टक्के क्षेत्रावरील पिक पाण्याअभावी बाधित झाले आहे. अन्य १२ तालुक्यांच्या तुलनेत वरुड व मोर्शी या दोन तालुक्यात निचांकी पाऊस झाला. अत्यल्प पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरिप पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने बिजांकूर कोमेजले आहेत. दुबार पेरणी करण्याशिवाय अन्य पर्याय नाही. आधीच अस्मानी संकटाने बेजार झालेल्या शेतकºयांसमोर आता दुबार पेरणीसाठी पैसे कुठून आमायचे ही नवी विवंचना निर्माण झाली आहे. दुसरीकडे दुबार पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस कोसळत नसल्याने शेतकरी नव्या पेचात अडकला आहे.
मोर्शी तालुक्यात १ जून ते २१ जुलै या कालावधीत एकूण ३२९.६ मिमि पाऊस अपेक्षित असतो. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत तालुक्यात केवळ १४०.९ मिमि अर्थात सरासरीच्या ४२.७ टक्के पावसाची नोंद झाली. मान्सूनच्या ५० दिवसांमध्ये तब्बल ५८ टक्के पावसाची तूट नोंदविली गेली. विशेष म्हणजे या कालावधीत गतवर्षी २२३ मिमि पाऊस पडला होता. तो यंदाच्या तुलनेत ८३ मिमिने अधिक होता. जुलैचा तिसरा आठवडा उलटत असताना वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १८.६ टक्के पावसाची नोंद तालुक्यात झाली.
वरुड तालुक्यावर तर पावसाने वक्रदृष्टी रोखली आहे. अन्य १३ तालुक्यांच्या तुलनेत वरुडमध्ये सर्वा कमी ३३.८ टक्केच पाऊस पडला. तालुक्यात १ जून ते २१ जुलै या कालावधीत ३७५.३ मिमि पाऊस अपेक्षित असतो. मात्र प्रत्यक्षात केवळ १२७ मिमि पाऊस झाला. ही टक्केवारी केवळ ३३.८ अशी निचांकी आहे. वरुडमधील नऊ सिंचन प्रकल्प अद्यापही कोरडे असून एका नदी नाल्याला पूर गेलेला नाही. अत्यल्प पर्जन्यमानाने सिंचनव्यवस्था कोलमडली आहे.

Web Title: Waiting for strong rain, Verd and Morshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.