१५ हजार झाडांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:18 PM2017-09-23T23:18:35+5:302017-09-23T23:19:01+5:30

पांढुर्णा व नागपूर रस्त्याच्या रुंदीकरणासह सिमेंटीकरणाचे काम सुरू झाले आहे. यामध्ये ५० ते १०० वर्षे जुन्या झाडांचा बळी जाणार आहे.

The victim of 15 thousand trees | १५ हजार झाडांचा बळी

१५ हजार झाडांचा बळी

Next
ठळक मुद्देलाखोंचा खर्च पाण्यात : वृक्ष लागवड केली कशाला, नागरिकांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : पांढुर्णा व नागपूर रस्त्याच्या रुंदीकरणासह सिमेंटीकरणाचे काम सुरू झाले आहे. यामध्ये ५० ते १०० वर्षे जुन्या झाडांचा बळी जाणार आहे. दुसरीकडे नुकतीच सामाजिक वनिकरणाच्यावतीने लावण्यात आलेली लहान झाडेदेखील उपडून फेकली जाणार असल्याने झाडे लावण्यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जाणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
सामाजिक वनिकरण विभागाकडून रस्त्याच्या दुतर्फा रोपे लावून त्यांचे झाडांत रुपांतर केले जाते. तीन वर्षांनंतर या रोपट्यांची झाडात रुपांतर झाल्यावर ती बांधकाम विभागाला हस्तांतरित केली जातात. तालुक्यातून जाणाºया रस्त्यावर या लहान झाडांची संख्या १५ हजार २२६ एवढी आहे. या झाडांच्या संगोपणासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र आता रस्ता रुंदीकरणासाठी या १५ हजार झाडांवर बुलडोजर चालविला जाणार आहे. यामुळे सामाजिक वनिकरणाचा लाखोंचा खर्च पाण्यात गेल्याचा आरोप तालुक्यातील वृक्षप्रेमी जनतेकडून केला जात आहे.
लावण्यात आलेल्या झाडांमध्ये निंब, पिंपळ, आंबा, पापडा, माहरुक, सह आदी वृक्षाच्या रोपांचा समावेश आहे.
वृक्षप्रेमींचा इशारा
महाकाय वृक्षांना जीवदान देण्याकरिता शासनाने वृक्षाचे पुन्हा रोपण करण्याची योजना आखण्यात यावी, अशी मागणी नागरिकांसह वृक्षप्रेमींद्वारा केली जात असून विकासाच्या नावावर अशी वृक्षतोड केल्यास आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा समाजप्रबोधन मंचचे अध्यक्ष प्रवीण चौधरी यांनी दिला आहे.
वृक्षलागवडीचा २० लाखांचा खर्च वाया
बेनोडा ते लाखारा ३ हजार २०० वृक्षांची लागवडीसाठी सन २०१५ -१६ मध्ये १३ लाख ८७ हजार ७८१ रुपये, धनोडा ते पुसला रस्त्यावर ७ हजार २२६ वृक्षांसाठी २६ लाख, शहापूर ते बेनोडा रस्त्यावर ४ हजार ८०० वृक्षांसाठी २० लाखांचा खर्च करण्यात आल्याची माहिती आहे

Web Title: The victim of 15 thousand trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.