पेपरफूट प्रकरणात दोन आरोपींना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 01:42 AM2019-06-19T01:42:23+5:302019-06-19T01:42:50+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात इंजिनीअरिंग मेकॅनिक्स या विषयाच्या पेपरफूट प्रकरणातील अटकेत असलेल्या दोन आरोपींना प्रथमश्रेणी न्यादंडाधिकारी व्ही.एन. देशपांडे यांच्या न्यायालयाने सोमवारी जामीन दिला. फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीचा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर आहे.

Two accused in bail bond case | पेपरफूट प्रकरणात दोन आरोपींना जामीन

पेपरफूट प्रकरणात दोन आरोपींना जामीन

Next
ठळक मुद्देतिसऱ्याचा अटकपूर्व जामीन अर्ज : फ्रेजरपुरा पोलिसांचा २१ जूनला जबाब

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात इंजिनीअरिंग मेकॅनिक्स या विषयाच्या पेपरफूट प्रकरणातील अटकेत असलेल्या दोन आरोपींना प्रथमश्रेणी न्यादंडाधिकारी व्ही.एन. देशपांडे यांच्या न्यायालयाने सोमवारी जामीन दिला. फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीचा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर आहे. याविषयी २१ जून रोजी सुनावणी होणार आहे.
आशिष राऊत (रा. बोर्डी, ता. अकोट, जि.अकोला) व निखिल फाटे (रा. पलाश गल्ली, गाडगेनगर, अमरावती) या अटकेतील आरोपींना न्यायालयाने जामीन दिला आहे. या दोघांनाही फ्रेजरपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. २९ मे रोजी पेपरफूट प्रकरण निदर्शनास आल्यानंतर विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध विद्यापीठाची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. यातील दोन आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीदेखील दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.
अखेर आशिष राऊत व निखिल फाटे यांना जामीन मंजूर झाला आहे. तिसरा आरोपी वाशिम येथील सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयाचा लिपिक ज्ञानेश्वर बोरे हा अद्यापही पसार आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज सदर केला आहे. दोन आरोपींच्या जामिनासाठी वकील प्रशांत देशपांडे, संजय चौबे यांनी बाजू मांडली. शासकीय अभियोक्ता पवार यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास फ्रेजरपुऱ्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र लेवटकर हे करीत आहेत. याप्रकरणी काही विद्यार्थ्यांचीदेखील चौकशी होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

Web Title: Two accused in bail bond case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.