पेढी नदीच्या पुलावर ट्रॅव्हल्स-ट्रकची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:39 PM2019-04-22T22:39:55+5:302019-04-22T22:40:23+5:30

अमरावती-परतवाडा मार्गावरील वलगावस्थित पेढी नदीच्या पुलावर ट्रॅव्हल्स व ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील दहा वऱ्हाडी जखमी झाले. सोमवारी सकाळी १० च्या सुमारास हा अपघात घडला. घटनेनंतर सुमारे दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Trawlers of Pedhi river bridge | पेढी नदीच्या पुलावर ट्रॅव्हल्स-ट्रकची धडक

पेढी नदीच्या पुलावर ट्रॅव्हल्स-ट्रकची धडक

googlenewsNext
ठळक मुद्देदहा वऱ्हाडी जखमी : दोन तास वाहतूक ठप्प, जीवितहानी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
टाकरखेडा संभू : अमरावती-परतवाडा मार्गावरील वलगावस्थित पेढी नदीच्या पुलावर ट्रॅव्हल्स व ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील दहा वऱ्हाडी जखमी झाले. सोमवारी सकाळी १० च्या सुमारास हा अपघात घडला. घटनेनंतर सुमारे दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
अमरावती येथील इंदरकुमार लखानी यांच्या मुलीच्या लग्नात सहभागी होण्याकरिता एमएच २७ पी ३७७७ या क्रमांकाची ट्रॅव्हल्स अमरावतीहून परतवाड्याकडे लग्नाची वरात घेऊन जात होती. त्याचवेळी वलगाव येथील पेढी नदीच्या पुलावरून एमएच ०९/०६०८ हा ट्रक वलगावहून गावाकडे जात होता. या दोन्ही वाहनांमध्ये सकाळी दहाच्या सुमारास समोरासमोर जबर धडक झाली. त्यात ट्रॅव्हल्समधील १० प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
जखमींमध्ये शरद रामरावजी नवरे, जानकी रमेश चांंदवानी (४८, मूर्तिजापूर), सोपान गजानन इंगळे (२८, लक्ष्मीनगर), रमेश चांदवानी (५०, रा. मूर्तिजापूर), मीना आहुजा, रोशन वरदानी, प्रिया वरदानी आदींचा समावेश आहे. यात ट्रकचालक नारायण चव्हाण हेदेखील जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.
या घटनेनंतर लगेच पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचली. मात्र गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनाही परिश्रम घ्यावे लागले. एमआयएमच्या सलमान अब्दुल्ला, तौफिक अहमद, शेख एजाज, शेख मोहसिन, मो. तौसिफ, सै. एजाज, मोहसिन खान, शे. जहीर, आसिफखॉ, कामरान अहमद, सोहेल खान, शोहेब शेख यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत जखमी तथा घटनास्थळावरील लोकांची थंड्या पाण्याने तृष्णा भागविली. यातील काहींना खासगी दवाखान्यात हलविण्यात आल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील सूत्रांनी दिली.
यशोमती 'एसर्इं'सह घटनास्थळी
आमदार यशोमती ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम खाात्याचे अधीक्षक अभियंता आणि पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. पुलावरील वाढते अपघात, सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, प्रवाश्यांना होणारा त्रास यासंबंधाने ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकाऱ्यांना वस्तुस्थितीची जाणीव करनू दिली. पूल अरंद असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी अधिकाºयांच्या लक्षात आणून दिले. उपाययोजना म्हणून पुलाचे रुंदीकरण आणि बांधकामासंदर्भात पेढी नदीवरील तो पूल चौपदरी करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी बांधकाम खात्याला दिल्या. राज्याचे मुख्यमंत्री, बांधकाम राज्यमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याशीही त्यांनी यासंबंधाने संपर्क केला.
वाहतूक कोलमडली
ट्रॅव्हल्स आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाल्याची माहिती मिळताच वलगाव येथील ग्रामस्थांनी पेढी नदीच्या पुलावर धाव घेतली. तर या वर्दळीच्या रस्त्याने ये जा करणाºया वाहनचालकांनी अपघातस्थळ गाठले. दोन्ही अपघातग्रस्त वाहने एकमेकांसमोर धडकल्याने अन्य वाहने जाण्यास पुलावर जागाच नव्हती. त्यामुळे सुमारे दोन तास दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या.
वाहनचालकांची पुलाखालून कसरत
पुलावर दोन्ही अपघातग्रस्त वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली. पुलाच्या दोन्ही बाजुची वाहतूक थांबविण्यात आली. त्यामुळे काही दुचाकी वाहनचालकांनी पुलाच्या खालच्या बाजुने उतरत पेढी नदीच्या कोरड्या पात्रातून वाहने काढली. पात्रातील वाहनांच्या गर्दीमुळे जखमी पुलाखाली तर पडले नाहीत ना, अशी विचारणा लोक एकदुसºयांना करित होते.

Web Title: Trawlers of Pedhi river bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.