अमरावती जिल्ह्यातील तळेगाव येथे हॉटेलमध्ये घुसला ट्रेलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 04:03 PM2018-11-21T16:03:42+5:302018-11-21T16:05:02+5:30

चालकाच्या दुर्लक्षामुळे भरधाव ट्रेलर हॉटेलमध्ये घुसल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथे घडली.

A trailer entered in the hotel at Talegaon in Amravati district | अमरावती जिल्ह्यातील तळेगाव येथे हॉटेलमध्ये घुसला ट्रेलर

अमरावती जिल्ह्यातील तळेगाव येथे हॉटेलमध्ये घुसला ट्रेलर

Next
ठळक मुद्देलाखोंचे नुकसान पाच दुचाकीसह ट्रकला उडविले, चालक पसार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चालकाच्या दुर्लक्षामुळे भरधाव ट्रेलर हॉटेलमध्ये घुसल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथे घडली. यामध्ये हॉटेलसमोर उभ्या असलेल्या पाच दुचाकीसह हॉटेलचे अंदाजे ५ लाखांचे नुकसान झाले.
पुलगावहून कारंजाकडे निघालेला भरधाव ट्रेलर सीजी-जेबी-९८९७ हा तळेगाव दशासरनजिकच्या हायवेवरील गतिरोधकावर नियंत्रित न झाल्याने थेट समोर जात असलेल्या ट्रक क्रमांक जी आर-१२/बीटी ७१५३ ला धडक दिली. यामध्ये संतुलन बिघडल्याने ट्रेलर थेट हॉटेलमध्ये घुसले. हॉलेटसमोर उभ्या असलेल्या एमएच२७ सीएफ-२३४२, एमएच २७ सीएफ-२३४१, एमएच २७ एएन ७२४४, एमएच २७ बीपी २२०५ व एमएच २७ सीएच-९८९१ अशा पाच दुचाकींनाही चिरडले. यामध्ये सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाल्याचे पंचनामादरम्यान पोलिसांनी सांगितले. माहिती मिळताच तळेगावचे ठाणेदार गोपाल उपाध्याय यांच्या मार्गदर्शना एएसआय देऊळकर, जमादार व हायवेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. घटनास्थळाची पाहणी करून ट्रेलरच्या चालविरुद्ध भादंविच्या कमल २७९, ४२७ आणि मोटार वाहन कायदा १८४, १३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. ट्रेलरचालक मात्र पसार झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

चौकात दिशादर्शक फलक नसल्याने होताहेत अपघात
सुपर एक्सप्रेस हायवेवरील तळेगाव दशासर येथून चोवीसही तास वाहतूक सुरू असते. या चौकातून विविध मार्गावरून बसेस उपलब्ध होत असल्याने प्रवाशांसह रोजगारांची गर्दी दिसून येते. त्यांच्या गरजपूर्तीच्या हिशेबाने आजूबाजूला हॉटेलदेखील आहेत. परंतु, येथील गतिरोधकालगत दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांना गतिरोधकाचा अंदाज येत नाही. त्यामुळे भरधाव वाहने तेथे नियंत्रित करणे अशक्य होऊन अशाप्रकारे अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.

हा मोठा अपघात असून, सुदैवाने जिवीतहानी टळली. ट्रेलर पोलीस ठाण्यात जमा केला असून, चालकाचा शोध घेत आहे.
- गोपाल उपाध्याय,
ठाणेदार, तळेगाव दशासर ठाणे

Web Title: A trailer entered in the hotel at Talegaon in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात