वडाळीचा गाळ काढण्यासाठी सरसावले हजारो हाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 01:22 AM2019-05-20T01:22:58+5:302019-05-20T01:23:16+5:30

महापालिका अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार व विविध सामाजिक संघटना यांच्यामार्फत रविवारी वडाळी तलावातील गाळ काढण्यात आला. यामध्ये नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदविला. यात नगरसेवक, नगरसेविका, विविध संस्थाचे पदाधिकारी, विविध संघटनेचे कार्यकर्ते, बचतगटाच्या महिला, मनपा कर्मचारी उपस्थित होते.

Thousands of hands have come to remove the mud of Vadali | वडाळीचा गाळ काढण्यासाठी सरसावले हजारो हाथ

वडाळीचा गाळ काढण्यासाठी सरसावले हजारो हाथ

googlenewsNext
ठळक मुद्देरविवारीही महाश्रमदान : नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, विविध सामाजिक संघटना सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार व विविध सामाजिक संघटना यांच्यामार्फत रविवारी वडाळी तलावातील गाळ काढण्यात आला. यामध्ये नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदविला. यात नगरसेवक, नगरसेविका, विविध संस्थाचे पदाधिकारी, विविध संघटनेचे कार्यकर्ते, बचतगटाच्या महिला, मनपा कर्मचारी उपस्थित होते.
या तलावाचे खोलीकरण होत असल्याने जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची समस्या उद्भवयाची शक्यता आहे. शहरातील पाण्याची पातळी वाढावी व जलपुनर्भरण होण्यासाठी रविवारी सकाळी ६ ते १० या वेळेमध्ये महाश्रमदानाच्या माध्यमाने एक हजार नागरिकांच्या सहभागातून तलाव खोलीकरण करण्यात आले. १२० ट्रक गाळ तलावातून काढण्यात आला. ५ जेसीबी व १० टिप्परच्या साहाय्याने गाळाचा उपसा करण्यात आला. श्रमदानानंतर महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी सर्व उपस्थितांचे सहकार्याबद्दल आभार मानले. वडाळी तलावातील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरूच राहील याचे नियोजन करण्यात येईल, असे ते म्हणाले. आरोग्य विभाग व बांधकाम विभाग यांनी रविवारी श्रमदानाचे नियोजन केले. राज्य राखीव पोलीस दल यांनी श्रमदानात महत्त्वाची भूमिका बजावली.

रविवारच्या श्रमदानात यांचा सहभाग
श्रमदानमध्ये उपमहापौर संध्या टिकले, आयुक्त संजय निपाणे, माजी महापौर मिलींद चिमोटे, नगरसेवक तुषार भारतीय, आशिषकुमार गावंडे, चेतन गावंडे, नगरसेविका सुरेखा लुंगारे, उपायुक्त महेश देशमुख, नरेंद्र वानखडे, मुख्यलेखापाल प्रेमदास राठोड, सहाय्यक संचालक नगर रचना आशिष उईके, सहाय्यक आयुक्त विशाखा मोटघरे, प्रशांत शेळके, तौसिफ काझी, शहर अभियंता रवींद्र पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे, विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण आदींचा सहभाग होता.

Web Title: Thousands of hands have come to remove the mud of Vadali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी