दिवाळीपूर्वी कर्जमाफी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:23 PM2017-10-18T23:23:14+5:302017-10-18T23:23:41+5:30

दिवाळीपूर्वी शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येईल, असे आश्वासन वेळोवेळी दिले असताना प्रत्यक्षात यंदाची दिवाळी आली तरीसुद्धा चावडी वाचनच सुरू आहे. ....

There is no debt relief before Diwali | दिवाळीपूर्वी कर्जमाफी नाहीच

दिवाळीपूर्वी कर्जमाफी नाहीच

Next
ठळक मुद्देशेतकºयांच्या तोंडाला पुसली पाने : पात्र लाभार्थ्यांची हिरवी यादी 'अपलोड' नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दिवाळीपूर्वी शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येईल, असे आश्वासन वेळोवेळी दिले असताना प्रत्यक्षात यंदाची दिवाळी आली तरीसुद्धा चावडी वाचनच सुरू आहे. आचारसंहिता असणाºया गावांमध्ये तेही झालेले नाहीत. कर्जमाफीसाठी तात्पुरत्या स्वरूपात पात्र शेतकºयांच्या हिरव्या रंगाच्या याद्याही अद्याप 'अपलोड' झालेल्या नाहीत. त्यामुळे दिवाळीपूर्वी कर्जमाफीच्या नावावर शासनाने शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बुधवारी ३२ शेतकºयांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्याचा सोहळा केवळ फार्स ठरला आहे.
राज्य शासनाने शेतकºयांचे दीड लाखांपर्यंतचे अल्प व मध्यम मुदती कर्ज माफ करण्याचा निर्णय २८ जूनला घेतला. ज्या शेतकºयांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले, अशा शेतकºयांना नियमाच्या अधीन राहून व ज्या शेतकºयांनी नियमित कर्जाचा भरणा केला, त्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने २८ जून, ५ व २० जुलै व ८ सप्टेंबरला शासनादेश निर्गमित केलेत. यासाठी जिल्ह्यातील निकषपात्र शेतकºयांकडून २३ सप्टेंबरपर्यंत ‘आपले सरकार’ सेवा पोर्टलवर आॅनलाइन अर्ज मागविले. जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ७९३ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले. या अर्जांची व बँकांच्या यादीची पडताळणी लेखापरीक्षकांद्वारा करण्यात आली. आतापर्यंत १ लाख ५ हजार शेतकºयांची १ ते ६६ कॉलमची माहिती 'अपलोड' करण्यात आली आहे. सध्या आचारसंहिता नसलेल्या गावांत चावडी वाचन करण्यात आले. ज्या गावात आचारसंहिता आहे, तेथे चावडी वाचनदेखील रखडले आहे. या याद्यांवरील आक्षेप, हरकती यावरील सुनावणी व्हायचीच असल्याने कर्जमाफीची प्रक्रिया अर्धवटच आहे. त्यामुळे तात्पुरत्या पात्र शेतकºयांच्या याद्याच 'अपलोड' झालेल्या नाहीत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत शेतकºयांचा सातबारा कोरा होणार नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
चार रंगांच्या याद्या; हिरव्या यादीलाच मिळणार लाभ
कर्जमाफीसंदर्भात चार रंगांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. यामध्ये हिरव्या रंगाच्या यादीत समाविष्ट ज्या नावांवर चावडीवाचनात आक्षेप आले, ती नावे राखून ठेवून इतरांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. पिवळ्या रंगाच्या यादीमध्ये अतिरिक्त प्रलंबित व आक्षेप असलेली नावे राखून ठेवण्यात येणार आहेत. लाल रंगाच्या यादीत तात्पुरत्या स्वरूपात अपात्र शेतकºयांची नावे असतील, तर पांढºया रंगाच्या यादीत कर्जमाफीसाठी विचाराधीन असलेल्या शेतकºयांची नावे राहणार आहेत.
बँकेला रक्कमच मिळाली नाही, कर्जमाफी कसली ?
जिल्ह्यात बुधवारी ३२ व मुंबईत १ अशा ३३ शेतकºयांचा शासनाद्वारा सत्कार करण्यात येऊन कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या शेतकºयांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी जिल्हा बँकेने खाते काढले आहे. त्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. या शेतकºयांच्या नावे जिल्हा बँकेच्या खात्यात दुपारपर्यंत रक्कमच जमा करण्यात आली नसल्याचे बँकेने सांगितले आहे.

Web Title: There is no debt relief before Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.