सुनील गजभियेचे न्यायालयात आत्मसर्मपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:50 AM2018-03-23T00:50:56+5:302018-03-23T00:50:56+5:30

शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी अ‍ॅड.सुनील गजभियेने गुरुवारी अखेर न्यायालयात आत्मसर्मपण केले. गाडगेनगर पोलिसांनी गजभियेला अटक करून पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमोर हजर केले.

Sunil Gajbhai's court self-esteem | सुनील गजभियेचे न्यायालयात आत्मसर्मपण

सुनील गजभियेचे न्यायालयात आत्मसर्मपण

Next
ठळक मुद्देसहा दिवसांपासून होता पसार : पोलीस आयुक्तांसमोर पेशी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी अ‍ॅड.सुनील गजभियेने गुरुवारी अखेर न्यायालयात आत्मसर्मपण केले. गाडगेनगर पोलिसांनी गजभियेला अटक करून पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमोर हजर केले. सीपींच्या कक्षात तब्बल पाऊण तास चौकशी चालली. मात्र, गजभियेच्या अटकेनंतरही पोलिसांनी शीतल पाटीलच्या हत्येविषयी नवा खुलासा केलेला नाही.
शनिवारपासून शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी सुनील गजभिये, रहेमान खा व अन्य चार जणांचा पोलीस कसून शोध घेत होते. गजभियेच्या परिचयातील व त्याच्या नातेवाईकांची कसून चौकशी सुरु केली होती. शहरासह अन्य जिल्ह्यातील आक्रमण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची कसून चौकशी पोलिसांनी सुरू केली. पोलीस चौकशीचा आवळलेला फास पाहता गजभियेने आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. सुनिल गजभियेने गुरुवारी सकाळी १०.१५ वाजता मुख्य न्यायदंडाधिकारी महेश कोठारी यांच्या न्यायालयात आत्मसर्मपण केले. गजभियेच्या आत्मसमर्पणाची माहिती गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी न्यायालयात जाऊन गजभियेला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस आयुक्तांसमोर झालेल्या पेशी दरम्यान गजभियेने शीतल पाटीलशी असलेल्या त्याच्या संबंधांविषयी माहिती दिली. १३ मार्च रोजी शितलसोबत असल्याची कबुली गजभियेने पोलीस आयुक्तांना दिली.
गजभियेने वापरला भाचाचा मोबाईल
पोलीस सूत्रानुसार, सुनील गजभिये गडचिरोली येथे एक दिवस थांबला होता. त्या ठिकाणी कोणाकडे थांबला व का थांबला, याच्या चौकशीकरिता पोलीस पथक गडचिरोली येथे जाणार आहे. तसेच गजभिये त्याच्या लोणी टाकळीजवळील एका गावात राहणाºया भाच्याच्या मोबाईलवरून संपर्क साधत होता.

गजभियेचे नातलग व आक्रमण संघटनेच्या पदाधिकाºयांची कसून चौकशी करण्यात आल्याने ते जेरीस आले, ही बाब लक्षात येताच गजभियेने आत्मसमर्पण केले. त्याला अटक करून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.

Web Title: Sunil Gajbhai's court self-esteem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून