वाळू व्यावसायिकाची विहिरीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 10:59 PM2018-06-17T22:59:58+5:302018-06-17T23:00:14+5:30

आर्थिक विवंचनेतून वाळू व्यावसायिकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. किशोर शंकर चांदुरे (३०,रा. रहाटगाव) असे मृताचे नाव आहे. ही घटना गाडगेनगर हद्दीतील एक्सप्रेस हायवेस्थित विहिरीत घडली.

Suicide of the wellness of a sand merchant | वाळू व्यावसायिकाची विहिरीत आत्महत्या

वाळू व्यावसायिकाची विहिरीत आत्महत्या

Next
ठळक मुद्देआर्थिक विवंचना : एक्स्पे्रस हायवेवरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आर्थिक विवंचनेतून वाळू व्यावसायिकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. किशोर शंकर चांदुरे (३०,रा. रहाटगाव) असे मृताचे नाव आहे. ही घटना गाडगेनगर हद्दीतील एक्सप्रेस हायवेस्थित विहिरीत घडली.
किशोरचा वाळूसह अन्य बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय होता. तीन दिवसांपूर्वी तो घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा परतला नाही. किशोर बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी रविवारी नांदगाव पेठ पोलिसांकडे केली. तक्रारीच्या काही वेळानंतरच किशोरचा मृतदेह एक्सप्रेस हायवेस्थित विहिरीत आढळून आला. गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे घटनास्थळी पोहोचल्यानंतर पंचनामा करण्यात आला. किशोरची एमएच २७ एझेड-०५०४ क्रमांकाची दुचाकी विहिर परिसरात आढळून आली. किशोरने व्यवसायासाठी काही कर्ज घेतले होते. त्यामुळे मानसिक तणावात येऊन त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाईक व मित्रमंडळींनी सांगितले.
याच विहिरीत फेकला होता शीतल पाटीलचा मृतदेह
सामाजिक कार्यकर्ता व आक्रमण संघटनेची पदाधिकारी शीतल पाटीलची हत्या करून तिचा मृतदेह एक्सप्रेस हायवेवरील याच विहिरीत फेकण्यात आला होता. त्याच विहिरीत किशोर चांदुरेचा मृतदेह आढळून आला .शीतल पाटीलच्या हत्येनंतर विहिरीवर जाळी बसविण्याच्या सुचना शेतमालकाला देण्यात आल्या होत्या. मात्र, अद्यापही जाळी बसविण्यात आली नाही.

Web Title: Suicide of the wellness of a sand merchant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.