Stressful peace in the district | जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता

ठळक मुद्देठिकठिकाणी जाळपोळ : दर्यापुरात विविध संघटना आक्रमक, अंजनगावात एकास मारहाण, जरूडात मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

अमरावती : भीमा कोरेगाव येथील आंदोलनानंतर संघटनांनी केलेले बंदचे आवाहन यशस्वी ठरले. संपूर्ण जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. सुमारे १० वाजता सर्व तालुका मुख्यालयापर्यंत पोचणारे प्रमुख रस्ते जाम झाले. सर्व तहसील कार्यालयासमोर निषेध सभा घेण्यात आल्या. दर्यापुरात आंबेडकरी संघटना आक्र मक झाल्या, अंजनगावात एका युवकास मारहाण झाली. बंदचा परिणाम प्रवाशी वाहतुकीवर झाला.
अंजनगाव सुर्जी : आंबेडकरी विचारधारा व संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात बुधवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शांतीपूर्ण असलेल्या मोर्चात एका दुचाकीने प्रवेश केला यामुळे तणाव निर्माण झाला, दुचाकीने जाणाºया तरुणास मारहाण झाल्याने निषेधाला गालबोट लागले. फिरोज खान महबूब खान (३६, रा.अजीजपुरा) हा या घटनेत जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी अमरावती येथे पाठवण्यात आले.
तिवसा : तालुक्यात मंगळवारी मुख्यमंत्री व सरसंघचालकांचा पुतळा जाळण्याच्या घटनेनंतर सुरू असलेली धग कायम होती. शहरातील दुकाने, पेट्रोलपंप, शाळा महाविद्यालये शंभर टक्के बंद होती, तर अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळण्यात आले. शहरात तणावपूर्ण वातावरण असून निषेध रॅली काढून सर्वपक्षीय निषेध सभा घेण्यात आली. दोषी आरोपींना अटक करून त्यांना फाशी देण्याची मागणी केली.
मोर्शी : तालुक्यात कडकडीत बंद करण्यात आलो. येथील फुले, शाहू, आंबेडकर विचाराचे कार्यकर्ते भक्कम असून संभाजी भिडे (गुरुजी) व मिलिंद एकबोटे यांना अटक करा, अशी मागणी केली. येथील आराध्य लान हॉटेलमधील खुच्यांर्ची फेकाफेक केली आहे. ग्रामीण भागात आष्टगाव, खेड, अंबाडा, चिंचोली गवळी, पाळा व इतर गावांमध्येसुद्धा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे आंबेडकरी संघटनांच्या आवाहनावर काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला.
धामणगाव रेल्वे : तालुक्यात आंबेडकरी संघटनांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला. शहर वगळता तालुक्यात सर्वत्र भिमा कोरेगावच्या घटनेचा निषेध केले. धामणगाव शहरात गुरुवारी बंद पाळण्यात येणार आहे. तालुक्यातील तळेगाव दशासर, देवगाव, अंजनसिंगी, मंंगरूळ दस्तगीर या मोठ्या गावातील दुकाने बंद होती़ दरम्यान शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानंतर तालुक्यातील ४२ जि़प़व माध्यमीक शाळा बंद ठेवण्यात आल्या. तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी तालुक्याचा दौरा करून शांततेचे आवाहन केले होते़
चांदूरबाजार : तालुक्यासह शहरात बंद पाळण्यात आला. बाजारपेठ सकाळपासून बंद असून शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आले. तळवेल येथे भीम सैनिकांनी रास्तारोको केले असल्याने अमरावती मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. स्थानिक बस स्थानकावरून बसेसची सेवा बंद ठेवण्यात आली होती. तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे आमदार बच्चू कडू यांचा शासकीय राहुटी कार्यक्रम सुरू असताना मोर्चातील काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राहुटी कार्यक्रम घेऊ नये, अशी विनवणी केली. हा कार्यक्रम काही दिवसांनंतर घेण्यात येईल, असे जाहीर करून कार्यक्रम बंद केला. तालुक्यातील आसेगावसह पूर्णानगर, चिंचोली, गोविंदपूर, विरुळपूर्णा, हिवरा, पोहरा, तामसवाडी, तळणी, टाकरखेडा पूर्णा आदी गावातील नागरिकांनी आसेगाव पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चा काढला.
नांदगाव खडेश्वर : शहरात बंदच्या आवाहनानंतर कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातून निषेध रॅली काढण्यात आली. तहसील कार्यालयासमोर निषेध सभेत भाषणे झाली. यावेळी अक्षय पारसकर, बाळासाहेब इंगळे, कुंदन मेश्राम, ऋषी गाडगे, सागर सोनोने, सिद्धार्थ मेश्राम, गजानन मारोटकर, आदींची उपस्थिती होती.
चांदूररेल्वे : शहरात रिपाइं, भाकप, किसानसभा, काँग्रेसच्या भारिप-बसपाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. बुधवारी शहरातील प्रतिष्ठाने बंद होती. काँग्रेसचे गणेश आरेकर, प्रदीप वाघ, बंडू देशमुख, सभापती प्रा. प्रभाकरराव वाघ, नगराध्यक्ष नीलेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुणे, माजी नगरसेवक बंडूभाऊ आठवले, किसानसभेचे जिल्हाध्यक्ष काँ. देवीदास राऊत यांच्यासह शेकडो युवकांनी घटनेविरूद्ध रॅली काढून निषेध केला.
प्रवाशी अडकले
धारणी, वरूड, मोर्शी, अचलपूर-परतवाडा या मोठ्या शहरात येणारे मध्यप्रदेशातील व मध्यप्रदेशात कामानिमित्त जाणाºया प्रवाशांना बंदचा फटका बसला. मध्यप्रदेशातून येणाऱ्या खासगी बस संचालकांनी सीमेवरून आपली वाहने परत बोलावून घेतली तर एसटी महामंडळाची चाके थांबल्याने जिल्ह्याअंतर्गत प्रवास करणाऱ्यांची अनेक कामे रेंगाळली. बंद दरम्यान दुचाकीने फिरणाऱ्यांची संख्या बरीच मोठी दिसून आली. मात्र जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंप बद असल्याने काहींना त्याचा फटका बसला. बहिरम यात्रेत येणाºया अनेकांना आपला बेत बदलावा लागला. यामुळे बहिरम यात्रेत बुधवारी तुलनेत कमी गर्दी दिसून आली.
मेळघाटात अत्यल्प प्रतिसाद
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात बंदचा क ोणताही परिणाम जाणविला नसल्याचे वृत्त आहे. धारणी शहरात काही कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. धारणीत व्यापारी प्रतिष्ठाणे सुरू होती. वाहतुकीवर मात्र बंदचा परिणाम जाणविला. चिखलदरा येथेही आंबेडकरी कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. बंदमुळे पर्यटक चिखलदऱ्यांपर्यंत पोहचू शकले नाहीत.


Web Title: Stressful peace in the district
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.