पिंपळखुटा फाटा येथे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:00 AM2018-02-23T01:00:06+5:302018-02-23T01:00:22+5:30

एच.जी. इन्फ्रा कंपनीच्या विरोधात जि.प. सदस्य संजय घुलक्षे यांनी गुरुवारी केलेल्या रास्ता रोको आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येत्या आठ दिवसांत त्यांनी केलेल्या संपूर्ण मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन कंपनीचे मॅनेजर गुलानी यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Stop the path at Pimplekhuta Phata | पिंपळखुटा फाटा येथे रास्ता रोको

पिंपळखुटा फाटा येथे रास्ता रोको

Next
ठळक मुद्देशेकडो नागरिक रस्त्यावर : रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी

ऑनलाईन लोकमत
मोर्शी : एच.जी. इन्फ्रा कंपनीच्या विरोधात जि.प. सदस्य संजय घुलक्षे यांनी गुरुवारी केलेल्या रास्ता रोको आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येत्या आठ दिवसांत त्यांनी केलेल्या संपूर्ण मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन कंपनीचे मॅनेजर गुलानी यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाला गालबोट लागू नये, यासाठी शिरखेडचे ठाणेदार चव्हाण यांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
एच.जी. इन्फ्रा कंपनीच्यावतीने सुरू असलेले नांदगाव, मोर्शी, वरूड महामार्गाचे विकासकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. गौण खनिज वाहतुकीच्या दळणवळणामुळे पिंपळखुटा (लहान) फाटा ते बोडणा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. दुहेरी जड वाहने पास होत नसल्यामुळे रस्त्याची अवस्था अतिशय गंभीर होऊन नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सततच्या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या धुळीने पिंपळखुटा, बोडणा येथील शेतकऱ्यांचा गहू, चणा व संत्रा या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. एकूणच शेतकरी, विद्यार्थी व सामान्य नागरिक यांची एकाच मुद्यावर समस्या असल्याचे पाहून राजूरवाडी सर्कलचे सदस्य संजय घुलक्षे यांच्या नेतृत्वात पिंपळखुटा (लहान) येथील बोडणा रस्ता फाट्यावर गुरुवारी सकाळपासूनच रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.
आंदोलनादरम्यान गुरूवारी पिंपळखुटा व बोडणा गावातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरून त्यांनी कंपनीचे हेवी लोडेड ट्रक अडविणे सुरू केले. त्यावेळी प्रचंड ताणतणाव निर्माण झाला होता. परिस्थिती चिघळत असल्याने कंपनीचे मॅनेजर गुलानी व राष्ट्रीय महामार्गाचे सहायक अभियंता पळसकर, जि.प. उपविभागीय अधिकारी जावरकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लेखी आश्वासन दिले. यावेळी सरपंच विमल टाके, पं.स. सभापती शंकर उईके, पं.स. सदस्य भाऊराव छापाने उपस्थित होते.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
पिंपळखुटा-बोडणा रस्त्याचे काम युद्धस्तरावर सुरू करण्यात येईल. हा रोड जिल्हा परिषदेच्या अधिकारक्षेत्रात येत असल्याने या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी जि.प. बांधकाम सभापती जयंत देशमुख एनओसी प्राप्त करून देणार आहेत. नांदगाव, मोर्शी, वरूड व रस्त्याच्या क्यूरिंगसाठी त्यावर सतत पाणी टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकावर धूळ उडणार नाही, त्या अधिनस्थ रस्त्यावरसुद्धा पाणी टाकण्यात येईल. धुळीने शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी त्यांना कंपनीच्यावतीने आर्थिक मदत देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Stop the path at Pimplekhuta Phata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.