बडनेऱ्यात नव्या जलकुंभ उद्घाटनाचे राजकीय नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:03 PM2018-05-20T23:03:00+5:302018-05-20T23:03:00+5:30

बडनेरा जुनिवस्तीस्थित नव्याने साकारलेल्या जलकुंभाचे रविवारी दोनदा नाट्यमय उद्घाटन झाले. भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात दुपारी पेढे भरविले, तर आ.रवि राणा यांनी जल्लोषात सायंकाळी जलकुंभ रीतसर सुरू झाल्याची घोषणा केली.

State drama of New Jalakumbha inauguration in Badnera | बडनेऱ्यात नव्या जलकुंभ उद्घाटनाचे राजकीय नाट्य

बडनेऱ्यात नव्या जलकुंभ उद्घाटनाचे राजकीय नाट्य

googlenewsNext
ठळक मुद्देएकाच दिवशी दोनवेळा आनंदोत्सव : युवा स्वाभिमानचा जल्लोष; भाजपने भरविले पेढे

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेरा जुनिवस्तीस्थित नव्याने साकारलेल्या जलकुंभाचे रविवारी दोनदा नाट्यमय उद्घाटन झाले. भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात दुपारी पेढे भरविले, तर आ.रवि राणा यांनी जल्लोषात सायंकाळी जलकुंभ रीतसर सुरू झाल्याची घोषणा केली.
जुनीवस्ती येथील जलकुंभाचे आयुर्मान संपुष्टात आल्यामुळे त्याच जागी शासन निधीतून नव्याने जलकुंभ साकारण्यात आले आहे. या जलकुंभाचे बांधकाम सुरू असताना बडनेरावासीयांना नवीवस्ती येथील जलकुंभातून पाणीपुरवठा व्हायचा. त्यामुळे गत सहा महिन्यांपासून पाण्याचे नियोजन कोलमडले. दरम्यान संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर धडक दिली. दररोज पाणी देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
पाणी वितरण सुलभ
मजीप्राचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांनी २० मे रोजी बडनेरा येथील नवनिर्मित जलकुंभ सुरू केले जाईल, अशी ग्वाही युवा स्वाभिमानच्या आंदोलनकर्त्यांना दिली होती. त्याअनुषंगाने मजीप्राने रविवारी जलकुंभ सुरू करण्याचे नियोजन चालविले. तत्पूर्वी भाजप, सेना, रिपाइंचे कार्यकर्ते जलकुंभ परिसरात पोहचले. शिवराय कुळकर्णी यांनी जलकुंभ निर्मितीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. अमृत योजनेतून जलकुंभाचे बांधकाम पूर्णत्वास येऊन पाणी वितरणासाठी टाकी सज्ज झाल्याने भाजपने पेढे भरविले. मुख्यमंत्र्यांनीच जलकुंभाचे उद्घाटन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी रिपाइंचे नगरसेवक प्रकाश बनसोड, शिवसेनेचे नगरसेवक ललित झंझाड, नगरसेविका गंगा अंभोरे, संदीप अंबाडकर, किरण अंबाडकर, मुकेश उसरे आदी उपस्थित होते.
दरम्यान सायंकाळी ५ वाजतादरम्यान आ. रवि राणा यांच्या नेतृत्वात जलकुंभाचे रितसर उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी ‘जल है तो कलम है’ अशा घोषणा देत पाण्याचे महत्व सांगण्यात आले. दरम्यान कार्यकर्त्यांनी आ. राणांच्या वचनपूर्तीबद्दल जल्लोष केला. हे जलकुंभ २० लक्ष रूपये खर्चून उभारण्यात आलेले असून, नाविण्यपूर्ण योजनेतून ते पूर्णत्वास आल्याची माहिती आ. राणा यांनी दिली.
यावेळी आ. रवि राणा यांच्यासह नगरसेविका सुमती ढोके, बळीराम ग्रेसपुंजे, अजय मोरय्या, अयूब खान, नीळकंठ कात्रे, नितीन मोहोड, लईक पटेल, विलास वाडेकर, नील निखार, मंगेश चव्हाण, सिद्धार्थ बनसोड, जावेद मेमन, किशोर अंबाडकर, नगरसेवक मो. साबीर, सादीक अली, रऊप पटेल, वसे गुरूजी, कमरूद्दीन, अमोल मिलखे आदी उपस्थित होते. यावेळी मजीप्राचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार, उपअभियंता किशोर रघुवंशी, अविनासे आदींनी हजेरी लावली होती. आ. राणांच्या हस्ते जलकुंभाचे उद्घाटन केल्यानंतर सायंकाळी ७ वाजता जलकुंभातून पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे गत सहा महिन्यापासून पाणी पुरवठ्याचे कोलमडलेले नियोजन पूर्ववत होणार आहे. रमजान महिना प्रारंभ होताच जलकुंभातून पाणी पुरवठा सुरू झाल्याने बडनेरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: State drama of New Jalakumbha inauguration in Badnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.