सात नगरपालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:39 PM2017-11-21T23:39:58+5:302017-11-21T23:40:20+5:30

जिल्ह्यातील सात नगरपालिकांमध्ये १७.३७ कोटी रुपये किमतीचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साकारले जाणार आहेत.

Solid Waste Management Project in seven municipalities | सात नगरपालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

सात नगरपालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

Next
ठळक मुद्दे१७.३७ कोटींचा खर्च : विलगीकरण अनिवार्य

आॅनलाईन लोकमत
अमरावती : जिल्ह्यातील सात नगरपालिकांमध्ये १७.३७ कोटी रुपये किमतीचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साकारले जाणार आहेत. या प्रकल्पांना नगरविकास विभागाने नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रकल्प निर्मितीसाठी या नगरपालिकांना सुमारे ४१ टक्के रक्कम स्वतिजोरीतून द्यावयाची आहे.
स्वच्छ पर्यावरण व चांगल्या आरोग्याकरिता स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्टÑ अभियान (नागरी) ची अंमलबजावणी सुरू असून, त्यात शहरे हगणदारीमुक्त करणे व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहर स्वच्छ करणे या दोन प्रमुख घटकांचा समावेश आहे. त्या अनुषंगाने महापालिका व नगरपालिकांचे डीपीआर नगरविकास विभागाने बनवून घेतले. त्या डीपीआर मजीप्राने तांत्रिक मान्यता दिली. निरीने मूल्यांकन केले व त्यानंतर प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकारी समितीच्या बैठकीत ज्या ४० शहरांच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता देण्यात आली, त्यात जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, मोर्शी व वरूड या नगरपालिकांचा समावेश आहे. या सात शहरांमध्ये अनुक्रमे ४.७८ कोटी, २.९० कोटी, १.५८ कोटी, १.३७ कोटी, १.३६ कोटी, २.५६ कोटी व २.८२ कोटी रुपये खर्चून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साकारले जातील. त्यातील ७.२ कोटी रुपये या नगरपालिकांना स्वहिस्सा द्यावा लागेल, तर ५९ टक्के निधी केंद्र व राज्य शासन देईल. या प्रकल्पांची कार्यान्वयन यंत्रणा संबंधित नगरपालिका राहतील. या सातही नगरपालिकांनी फेब्रुवारी २०१८ पर्यंत शहरात दररोज निर्माण होणाºया घनकचºयापैकी किमान ९० टक्के घनकचरा निर्मितीच्या जागीच विलगीकरण करून संकलित करणे बंधनकारक आहे.

Web Title: Solid Waste Management Project in seven municipalities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.