पाण्याची वाफ बनविणारा सोलर एनर्जी कॉन्सन्ट्रेटर; अमरावतीमधील निवृत्त विभागप्रमुखांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:32 AM2019-06-24T10:32:52+5:302019-06-24T10:34:18+5:30

राष्ट्रसंत कॉलनी येथील रहिवासी आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे निवृत्त भौतिकशास्त्र विभागप्रमुख बी.एच. पवार यांनी सोलर एनर्जी कॉन्सन्ट्रेटर बनवले आहे.

Solar Energy Concentrator Making Water Vapor; Production of retired divisional heads in Amravati | पाण्याची वाफ बनविणारा सोलर एनर्जी कॉन्सन्ट्रेटर; अमरावतीमधील निवृत्त विभागप्रमुखांची निर्मिती

पाण्याची वाफ बनविणारा सोलर एनर्जी कॉन्सन्ट्रेटर; अमरावतीमधील निवृत्त विभागप्रमुखांची निर्मिती

Next
ठळक मुद्देजैविक इंधनाचा भार होईल कमी औद्योगिक वापरासाठी इंधनाचा नवा पर्याय

धीरेंद्र चाकोलकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राष्ट्रसंत कॉलनी येथील रहिवासी आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे निवृत्त भौतिकशास्त्र विभागप्रमुख बी.एच. पवार यांनी सोलर एनर्जी कॉन्सन्ट्रेटर बनवले आहे. यामध्ये सौरऊर्जेचा वापर करून पाण्याची वाफ बनवण्यापर्यंतचे तापमान सौर ऊर्जा प्लेटची रचना बदलून तयार करण्यात आले आहे. या वाफेचा वापर स्वयंपाकात थेट कूकरमध्ये करण्याचा आणि त्याद्वारे जैविक इंधनाचा भार कमी करण्याचा मनोदय पवार यांनी व्यक्त केला आहे. या वाफेचा वापर करून औद्योगिक क्षेत्रात रिएक्टरसाठी करून पारंपारिक विजेवर भार कमी करण्याचे या प्रयोगाचे उद्दिष्ट आहे.
या सेमी सिलेंड्रिकल आकाराच्या रिफ्लेक्टरच्या तळाशी स्टेनलेस स्टीलचे काळा रंग लावलेले पाईप जोडले आहेत. त्यातून सिलेंडरमध्ये एका बाजूने आणलेले पाणी सौरऊर्जेद्वारे तापून दुसऱ्या बाजूला त्याची वाफ बाहेर पडते. साधारणपणे १०० अंश डिग्री सेल्सिअस तापमानात पाण्याची वाफ होते. तेवढे तापमान या सोलर एनर्जी कॉन्सन्ट्रेटरमध्ये जनरेट करायची किमया पवार यांनी केली आहे.
एवढेच नव्हे तर जनरेटरला शक्ती पुरविण्यासाठी याद्वारे तयार झालेली वाफ वापरली जाऊ शकते. याशिवाय वाफेचा वापर अन्न शिजविण्यासाठी तसेच विशिष्ट तव्याचा वापर करून पोळ्या भाजण्याच्या कामातदेखील होऊ शकतो. त्यामुळे देशातील कोट्यवधी रुपयांच्या इंधनाचा प्रश्न सुटेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.
इंस्युलेटरचा वापर करून प्लेटखालील तापमान नियंत्रित करून उष्माघाताच्या रुग्णांसाठी दिलासादायक वातावरण तयार करता येईल, अशी संकल्पनादेखील पवार यांनी मांडली. हे उपकरण मेडासह सर्व शासकीय विभागांना सादर करून तांत्रिक मंजुरी मिळविण्याच्या हालचाली पवार यांनी केल्या आहेत. या तांत्रिक कार्यात त्यांना मुलगा अभिजित पवार यांनी सहकार्य केले. उपकरणात आणखी सुधारणा करण्यासाठी त्यांचे प्रयोग सुरू आहेत.

स्टेनलेस स्टील पत्र्याचा तयार केला कॉन्केव्ह मिरर
बी.एच. पवार यांनी या उपकरणासाठी ४ बाय २ फुटाच्या स्टेनलेस स्टील पत्र्याचा कॉन्केव्ह मिरर तयार केला. त्यावर ५० बाय १६ इंचाची काच बसविली आणि त्याखालून एक इंच व्यासाचे स्टेनलेस स्टील पाईप काढले आहेत. हे उपकरण पाणी शुद्धीकरण, डिस्टिल्ड वॉटर प्लांटमध्ये वापरले जाऊ शकते.

सेमी सिलेंड्रिकल आकाराचे रिफ्लेक्टर वापरले
सौर ऊर्जा प्लेटची रचना साधारणपणे आयताकृती वा चौकोनी असते. त्यामुळे त्यावर पडणारा सूर्यप्रकाश बहुतांश रिफ्लेक्ट होतो. त्यामुळे सौर ऊर्जा बहुतांश कमी धारण केली जाते.
ही अडचण लक्षात घेऊन पवार यांनी सेमी सिलेंड्रिकल आकाराचे रिफ्लेक्टर वापरले आहे. वक्र आकाराच्या रिफ्लेक्टरमुळे सौर ऊर्जा पूर्णपणे आत शोषली जाते.

Web Title: Solar Energy Concentrator Making Water Vapor; Production of retired divisional heads in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.