महागाईविरोधात शिवसेनेचे ‘भीख मांगो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:42 AM2018-04-25T01:42:58+5:302018-04-25T01:42:58+5:30

सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे. अशातच पेट्रोल व डिझेलच्या भावातही वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या जनहितविरोधी धोरणाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे उपशहरप्रमुख अमोल निस्ताने यांच्या नेतृत्वात २४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात डफळी वाजवत भीख मांगो आंदोलन करण्यात आले.

Shivsena's 'begging demand' movement against inflation | महागाईविरोधात शिवसेनेचे ‘भीख मांगो’ आंदोलन

महागाईविरोधात शिवसेनेचे ‘भीख मांगो’ आंदोलन

Next
ठळक मुद्देजिल्हा कचेरीत भजन : जमा रक्कम दिली पंतप्रधान निधीला

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे. अशातच पेट्रोल व डिझेलच्या भावातही वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या जनहितविरोधी धोरणाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे उपशहरप्रमुख अमोल निस्ताने यांच्या नेतृत्वात २४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात डफळी वाजवत भीख मांगो आंदोलन करण्यात आले. यावेळी जमा रक्कम व मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी के.आर. परदेशी यांच्याकडे सोपविण्यात आले.
देश चालविण्याची मोठी जबाबदारी सोपविलेल्या जनतेकरिता, वाहनचालकांकरिता मतदारासाठी चिल्लर पद्धतीने पेट्रोल व डिझेलची दरवाढ करीत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतीचे चार वर्षांपासून तुणतुणे वाजवित जीवघेणी दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारने पेट्रोलियम मंत्री व विभाग चिल्लर पद्धती बंद करून सरसकटपणे शंभर रुपये दरवाढ करावी, अन्यथा जनतेवर लादण्यात येणारी पेट्रोल व डिझेलच्या दरातील सततची दरवाढ कायमची बंद करावी, वाढती महागाई रोखण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. वाढत्या महागाईला जनता आता कंटाळली आहे. परिणामी जनतेत सरकारप्रति रोष वाढला आहे. त्यामुळे वरील विषयावर केंद्र व राज्य शासनाने तोडगा काढावा, अशी मागणी अमोल निस्ताने यांनी निवेदनाद्वारा केली.
दरम्यान, आंदोलनापूर्वी जिल्हा कचेरीत मोदी सरकारविरोधात डफळीवर भजन म्हणत शिवसैनिकांनी भीक मागून जमा झालेली रक्कम पंतप्रधानाकडे पाठविली आहे. या आंदोलनात सुनील राऊत, मोहन क्षीरसागर, तुषार वाइंदेशकर, दीपक काळे, आदित्य पडघामोर, विक्की मुळे, माधव वानखडे, प्रवीण मेश्राम, विशाल कावरे, प्रशांत काळे, शैलेंद्र डहाके, प्रमोद राऊत, छोटू इंगोले आदींचा सहभाग होता.

Web Title: Shivsena's 'begging demand' movement against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.