पोलीस शिपायाचा प्रेयसीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 01:12 AM2019-05-16T01:12:37+5:302019-05-16T01:13:34+5:30

ग्रामीण पोलीस विभागातील एका शिपायाने प्रेयसीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी पोलीस तक्रारीनंतर उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी महेश अशोक सोळंके (३०, रा. वरूड) याच्यासह एका तरुणीविरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलिसांनी दोघांचाही शोध सुरू केला आहे.

Sexual harassment at a girl of a police force | पोलीस शिपायाचा प्रेयसीवर लैंगिक अत्याचार

पोलीस शिपायाचा प्रेयसीवर लैंगिक अत्याचार

Next
ठळक मुद्देआरोपीचा शोध सुरू : फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ग्रामीण पोलीस विभागातील एका शिपायाने प्रेयसीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी पोलीस तक्रारीनंतर उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी महेश अशोक सोळंके (३०, रा. वरूड) याच्यासह एका तरुणीविरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलिसांनी दोघांचाही शोध सुरू केला आहे.
पोलीस तक्रारीनुसार, फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २७ वर्षीय पीडित तरुणीचे काही वर्षांपूर्वी महेशसोबत प्रेमसुत जुळले. प्रेमप्रकरणानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. यानंतर महेश ग्रामीण पोलीस दलात रुजू झाला, तर त्याच्या प्रेयसीचेही लग्न झाले. लग्नानंतर तरुणीने पतीसोबत संसार थाटला. त्यांना दोन अपत्ये झाली.
दरम्यान, फेसबूकने त्यांच्यात प्रेमप्रकरण पुन्हा बहरले. प्रेयसी पतीसोबत सुखी संसारात मग्न असताना, महेश तिला वारंवार फोन करू लागला. एकदा महेशने व्हिडीओ कॉल करून प्रेयसी असणाऱ्या सदर विवाहितेला नग्न अवस्थेत पाहण्याची मागणी केली. ती मागणी तिने पूर्ण करताच महेशने वारंवार त्यासाठीच तगादा लावला.
महेशने ३ मे रोजी तिला कॉल करून वडाळीच्या बगिच्यात बोलाविले. दुपारच्या वेळेत ती भेटायला गेली. यावेळी महेशने तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर महेशने तरुणीला वरूडला नेले. मात्र, सोबत राहण्यास नकार दिला. त्यामुळे तिने हातावर ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्या हाताची नस कापली गेल्याने महेशने तिला रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर भाड्याने वाहन करून त्याने अमरावती गाठली. मार्गातच त्याने पुन्हा तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. दरम्यानच्या काळ्यात पत्नी घरी नसल्याचे पाहून तिच्या पतीने शोध सुरू केला, तर तिच्या भावाने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामुळे महेशने तिला फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात हजर केले. तिने महेशसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे पोलिसांनी तिला त्याच्यासोबत पाठविले. महेश पुन्हा तिला घेऊन वरूडला गेला. यावेळी महेशच्या ओळखीतील एक महिला खोलीवर आली. तिने व महेशने पीडित तरुणीला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी महेशचे मित्र व भावाने तरुणीची समजूत घालून अमरावतीला आणले. यानंतर तरुणीने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महेश सोळंकेसह एका तरुणीविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यांचा शोध सुरू आहे.
व्हिडीओ कॉलवर निर्वस्त्र पाहण्याची मागणी
प्रेयसीचे लग्न झाल्याचे माहीत असतानाही, महेश प्रेयसीला वारंवार कॉल करीत होता. एकदा व्हिडीओ कॉल करून तिला निर्वस्त्र पाहण्याची विचित्र मागणी महेशने केली. तिने ती मान्य केली. मात्र, त्यानंतरही महेश वारंवार मागणी करीत होता. दरम्यान, काही वेळा महेशने प्रेयसीवर अनैसर्गिक कृत्य केले. तो घृणास्पद चाळे करायला लावत असल्याचे पीडिताने तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Sexual harassment at a girl of a police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.