लाचेची मागणी करणाऱ्या  एएसपीचे घर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 08:07 PM2018-01-31T20:07:11+5:302018-01-31T20:10:16+5:30

गुन्ह्यातील दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मदत केल्याच्या मोबदल्यात दोन लाखांची मागणी करणाऱ्या  सहायक पोलीस अधीक्षकासह अन्य एका जणाविरुद्ध नांदेड येथील अर्धापूर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदविला.

Seal the ASP's house demanding the bribe | लाचेची मागणी करणाऱ्या  एएसपीचे घर सील

लाचेची मागणी करणाऱ्या  एएसपीचे घर सील

Next
ठळक मुद्देअमरावती एसीबीची नांदेडमध्ये कारवाई : दोन लाखांची मागितली होती लाच

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती : गुन्ह्यातील दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मदत केल्याच्या मोबदल्यात दोन लाखांची मागणी करणाऱ्या  सहायक पोलीस अधीक्षकासह अन्य एका जणाविरुद्ध नांदेड येथील अर्धापूर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदविला. या लाचेच्या मागणीची अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून सहायक पोलीस अधीक्षक विजयकृष्ण यादव (३७, रा. इतवारा, नांदेड) याचा शोध सुरु केला असून, बुधवारी त्याचे नांदेड येथील घर सिल केले आहे.
तक्रारकर्ता हा बिल्डींग मटेरियलचा व्यवसाय करीत असून, त्याच्यावर तिवसा (जि. अमरावती) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी, ट्रक सोडविण्यासाठी तसेच दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मदत केल्याबद्दल मोबादला म्हणून विजय यादवने तक्रारकर्त्याला दोन लाखांची मागणी केली होती. याबाबत अमरावती एसीबीच्या अधिकाºयांनी पंचासमक्ष प्रत्यक्ष पडताळणी केली असता, यादवने लाच मागितल्याचे निदर्शनास आले. या लाचेच्या रकमेतील पहिला टप्पा म्हणून एक लाख देण्याची मागणी केल्याचे एसीबीच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. ही लाचेची रक्कम त्याने मध्यस्थ सन्नीसिंग इंदरसिंग बुंगई (३४, रा. भगतसिंग रोड, नांदेड) याला स्वीकारण्यास सांगितले होते. त्यानुसार सापळा रचून एसीबीच्या अधिकाºयांनी सन्नीसिंग बुंगईला एक लाखाच्या लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. पोलिसांनी बुंगईला ताब्यात घेऊन अर्धापूर पोलिसांच्या स्वाधीन केले असून, पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा नोंदविला. सद्यस्थितीत आरोपी विजय यादव पसार असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान अमरावती एसीबी पथकाने यादव याचे घर सील केले आहे.
विजय यादव हा आयपीएस
मूळ आंध्रप्रदेशातील विजयकृष्ण यादव याची २०१५ मध्ये यूपीएससीद्वारे निवड झाली. सुरुवातीला प्रशिक्षणार्थी म्हणून अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली. वाळू कंत्राटदाराविरुद्ध तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने आरोपीला अटक न करण्यासाठी, पकडलेले ट्रक सोडण्यासाठी व गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल करण्यास मदत केल्याबद्दल लाच मागितल्याचे उघड झाले आहे. ही घटना सहा महिन्यांपूर्वी घडली. त्यानंतर यादव प्रशिक्षणासाठी गेला होता. प्रशिक्षणावरून परतल्यानंतर त्याचे नांदेडमधील इतवारा उपविभागात रुजू झाले. ही त्याची पहिली नियमित पोस्टिंग होती.
आरोपी विजय यादव अद्याप हाती लागलेला नाही. त्याचे घर सील करण्यात आले असून, शोध सुरू आहे.
श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, अमरावती एसीबी.

Web Title: Seal the ASP's house demanding the bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.