अमरावती जिल्ह्यावर ‘स्क्रब टायफस’चे मळभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:00 PM2017-10-30T12:00:23+5:302017-10-30T12:03:24+5:30

सिंधुदुर्ग आणि नागपूर जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस' या कीटकजन्य आजाराचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याची आरोग्य यंत्रणा सजग झाली आहे.

'Scrab Typhus' in Amaravati district | अमरावती जिल्ह्यावर ‘स्क्रब टायफस’चे मळभ

अमरावती जिल्ह्यावर ‘स्क्रब टायफस’चे मळभ

Next
ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा सजग उपाययोजनांचे निर्देश

प्रदीप भाकरे ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : सिंधुदुर्ग आणि नागपूर जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस' या कीटकजन्य आजाराचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याची आरोग्य यंत्रणा सजग झाली आहे. राज्यात इतरत्र या आजाराची लागण होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य यंत्रणेला देण्यात आले.
रिकेटशिअल आजारात मोडणाऱ्या स्क्रब टायफसवर नियंत्रण राखण्यासाठी या आजाराचे नियमित सर्वेक्षण, निदान व उपचाराबाबत पायाभूत सुविधा बळकट करण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य सेवा सहसंचालकांनी उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याना दिले आहेत. कीटकापासून माणसात संक्रमित होणाऱ्या ‘स्क्रब टायफस’ या आजाराचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल २ आॅक्टोबरला प्राप्त झाला. त्याअनुषंगाने रिकेटशियल आजाराबाबत प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

स्क्रब टायफसची लक्षणे
‘स्क्रब टायफस’ या आजारात झटके येणे, शरीरातील पाणी कमी होणे, ताप येणे, अशी लक्षणे आढळतात. हा ताप १०४ डिग्रीपर्यंत राहतो. साधारण २४ तासाच्या आत थकवा येणे, अंगदुखी, स्रायू, सांधे दुखू लागतात. या आजाराचे वेळीच निदान झाले नाही तर शरीरात दबा धरुन बसणारे हे परजिवी मेंदूची, मुत्रपिंडाची क्रिया बंद पाडू शकतात. साधारणपणे ताप आणि काविळीचे लक्षणे आढळून आल्यानंतरही हा आजार अनेकदा डोके वर काढतो.

काय आहे स्क्रब टायफस ?
ओरिएन्शिया सुसुगामशी’ नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर आजार म्हणजे स्क्रब टायफस. कीटकापासून माणसात संक्रमित होणाऱ्या  या आजारात ज्या ठिकाणी ‘चिगर’ चावतो तेथे एक व्रण येतो. जेथे झाडीझुडूप किंवा गवत असते, त्यावर हे ‘चिगर’ कीटक असतात. साधारणपणे पानावर वाढणाऱ्या  कीटकांपासून स्क्रब टायफस होतो. या कीटकाने चावा घेतल्यानंतर त्याच्या सोंडेतील विषाणू रक्तामार्फत शरीरात प्रवेश करतात. अतिशय सूक्ष्म असलेला हा किडा उकिरडे, शेणखत आणि काडीकचऱ्यावर जगतो. हा आजार ‘माईटस्द्वारा पसरणारा कीटकजन्य आजार आहे. बºयाचशा भागात हा सिझनल असला तरी जिथे लोकांचा झाडाझुडुपांशी नियमित संपर्क येतो, तेथे हा वर्षभर आढळतो.

Web Title: 'Scrab Typhus' in Amaravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य