वरुडच्या संत्र्याची होतेय विक्री थेट बंगळुरूच्या मॉलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 09:44 AM2017-12-13T09:44:52+5:302017-12-13T09:46:58+5:30

थेट मार्केटिंग व विक्रीच्या पर्यायातून अधिक नफा मिळविण्यात वरूड येथील श्रमजिवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी यशस्वी झाली आहे.

The sale of Varud's oranges directly to the Bangalore mall | वरुडच्या संत्र्याची होतेय विक्री थेट बंगळुरूच्या मॉलमध्ये

वरुडच्या संत्र्याची होतेय विक्री थेट बंगळुरूच्या मॉलमध्ये

ठळक मुद्देसंत्र्याचे यशस्वी मार्केटिंगगटशेतीच्या माध्यमातून संत्रा उत्पादकांनी साधली किमया

वीरेंद्रकुमार जोगी ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : थेट मार्केटिंग व विक्रीच्या पर्यायातून अधिक नफा मिळविण्यात वरूड येथील श्रमजिवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी यशस्वी झाली आहे. कंपनीच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांचा संत्रा थेट बंगळुरू येथील मॉलमध्ये पाठविण्यात येत आहे. या माध्यमातून सात ते आठ हजार रुपये प्रतिटन अतिरिक्त पदरी पडल्याने संत्रा उत्पादकांना जादाचा नफा हाती पडू लागला आहे.
अमरावतीच्या संत्र्याची चव वैशिष्ट्यपूर्ण असल्याने त्यास मोठी मागणी आहे. मात्र, प्रक्रिया व वाहतुकीअभावी संत्रा उत्पादकांना याचा फायदा होत नाही. अमरावती जिल्ह्यातील बहुतांश संत्रा व्यापारी घेऊन जातात. व्यापाºयांची मक्तेदारी तोडण्यासाठी श्रमजिवी नागपुरी संत्रा उत्पादक या शेतकऱ्यांच्या कंपनीने पुढाकार घेतला. आठ संत्रा उत्पादक गट व वैयक्तिक संत्रा उत्पादक अशा एकूण १७१ सभासदातून ‘श्रमजिवी’ उभी राहिली. एकूण २८० हेक्टर क्षेत्रात लागवडीखाली असलेल्या बागांमधून संत्रा एकत्र करून त्याचे विपणन करण्याची जबाबदारी या संस्थेवर आहे. श्रमजिवीने २०१५-१६ साली ३७ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. तर यंदाही संत्रा बागावर निसर्गाचा प्रकोप झाला असताना स्वत: संत्र्याची वाहतूक करण्याचा निर्णय वरूड येथील श्रमजिवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीने घेतला. यातून संत्रा उत्पादकांची आर्थिक प्रगती साधली जात आहे.

५२ रुपये प्रतिकिलो मिळाला दर
कंपनीचे अध्यक्ष नीलेश मगर्दे व रमेश जिचकार यांनी फ्युचर रिटेल कंपनीसोबत सामजंस्य करार केला. यात ६५ मिमीपेक्षा अधिक आकाराच्या संत्रा फळांचा आठ मेट्रिक टन पुरवठा बिग बाजार, फ्युचर रिटेल बंगळुरू येथे ५२ रुपये प्रतिकिलो दराने करण्यात आला. याशिवाय मॉलपर्यंत पोचरिण्याचा खर्च वेगळा देण्यात आला. यामुळे सात ते आठ हजार रुपये प्रतिटन जादा लाभ मिळाला आहे.


पाच वर्षांत दुपटीने उत्पादन
सन २०२२ पर्यंत वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांचे संत्रा उत्पादन व उत्पादकता दुप्पट करण्यासाठी विविध उपक्र म राबविण्यात येत आहेत. यात उत्पादकांना संघटित करणे, उत्पादकता व उत्पन्न वाढविणे, विविध विस्तार कार्यक्रम राबविणे, वाजवी दरात कृषी निविष्ठा, खते, बुरशीनाशके व कीटकनाशकांचा पुरवठा करणे, उत्पादित मालाचे संकलन, प्रक्रिया व विक्री व्यवस्था मजबूत करणे आदी उद्दिष्टांचा समावेश आहे.

अमरावतीच्या संत्र्यांची चव ही सर्वश्रेष्ठ आहे. मात्र, प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा उत्पादक मागे पडले आहेत. त्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न श्रमजिवीच्या माध्यमातून केला आहे. उत्पादकांना याचा थेट लाभ मिळेल, त्यांचे उत्पन्न वाढेल.
- रमेश जिचकार
श्रमजिवी संत्रा उत्पादक कंपनी

Web Title: The sale of Varud's oranges directly to the Bangalore mall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार