संत बेंडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव गुरुवारपासून, पावणेसातशे वर्षांची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 04:39 PM2018-01-16T16:39:24+5:302018-01-16T16:39:37+5:30

राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या घुईखेड येथील संत बेंडोजी महाराज संजीवन समाधी सोहळा व यात्रेला गुरुवार, १८ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या यात्रेला तब्बल ६७३ वर्षांची परंपरा लाभलेली आहे.

Saint Bandovi Maharaj Punyathithi Festival from Thursday, from Paavna, 96 years of tradition | संत बेंडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव गुरुवारपासून, पावणेसातशे वर्षांची परंपरा

संत बेंडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव गुरुवारपासून, पावणेसातशे वर्षांची परंपरा

googlenewsNext

 अमरावती -  राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या घुईखेड येथील संत बेंडोजी महाराज संजीवन समाधी सोहळा व यात्रेला गुरुवार, १८ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या यात्रेला तब्बल ६७३ वर्षांची परंपरा लाभलेली आहे.
संत बेेंडोजी महाराज यांनी वयाच्या १६ व्या वर्षी समाधी घेतली. संत ज्ञानेश्वर माउलीनंतर स्वत: सांगून तथा शिष्य व भक्तांना साक्ष ठेवून घेतली गेलेली ही एकमेव समाधी आहे़ बेंडोजी महाराज नाथ संप्रदायाच्या मालिकेतील आहेत़ बेंडोजी महाराजांचा काळ इ.स. १३०० ते १३५० सांगितला जातो. घुईखेडचे  अमृत पाटील घुईखेडकर ८०० एकर जमीन संस्थानला दान दिली होती. 
पालखीत मिळतेय अव्वल स्थान
घुईखेड ते पैठण, आळंदी, पंढरपूर असा ४८ दिवसांचा प्रवास करणारी वºहाड प्रांतातील एकमेव वारी अनेक वर्षांपासून जात आहे़ सध्या या दिंडीचा मान माउलींच्या पालखीसह विठ्ठल मंदिरात पुढून प्रवेश करणाºया २१ मानकºयांमध्ये १७ वा क्रमांक आहे़ ही परंपरा कायम आहे़ 
सात दिवस चालणार यात्रा महोत्सव
सात दिवसांच्या महोत्सवात संत बेंडोजी महाराज ग्रंथाचे पारायण तसेच दररोज सकाळी काकड आरती, सामुदायिक प्रार्थना व सायंकाळी विविध संतांचे कीर्तन, प्रवचन, भजन आयोजित करण्यात आले आहे़ २५ जानेवारी रोजी संजीवन समाधी सोहळा होणार आहे. यानिमित्त राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात हजेरी लावणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, सचिव बाळासाहेब देशमुख, कोषाध्यक्ष दिनकर घुईखेडकर, सदस्य प्रवीण घुईखेडकर, विजय घुईखेडकर, विवेक घुईखेडकर, शशिकांत चौधरी यांनी दिली़

Web Title: Saint Bandovi Maharaj Punyathithi Festival from Thursday, from Paavna, 96 years of tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.