व्यापारांच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 10:32 PM2019-01-16T22:32:56+5:302019-01-16T22:34:28+5:30

जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम विदर्भात ख्यातिप्राप्त असलेल्या अमरावती बाजार समितीमध्ये सन २०१९-२० करिता परवाना नूतनीकरण प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू होत आहे. यावेळी प्रथमच बाजार समितीद्वारे नव्याने अटी-शर्ती टाकल्याने बनावट परवान्यांना आळा बसणार आहे. एक वर्षाच्या परवान्यावर दुकानदारी थाटून बाजार समितीला चुना लावणाºयांचा बंदोबस्त होणार आहे.

Rumors | व्यापारांच्या आवळल्या मुसक्या

व्यापारांच्या आवळल्या मुसक्या

Next
ठळक मुद्देबाजार समितीत बोगस परवाऱ्यांना चाप : नूतनीकरणात नव्याने अटी, शर्ती समाविष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम विदर्भात ख्यातिप्राप्त असलेल्या अमरावती बाजार समितीमध्ये सन २०१९-२० करिता परवाना नूतनीकरण प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू होत आहे. यावेळी प्रथमच बाजार समितीद्वारे नव्याने अटी-शर्ती टाकल्याने बनावट परवान्यांना आळा बसणार आहे. एक वर्षाच्या परवान्यावर दुकानदारी थाटून बाजार समितीला चुना लावणाºयांचा बंदोबस्त होणार आहे.
बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात नियमन केलेल्या शेती उत्पादनावर व्यवसाय करणारे परवानाधारक अडते, खरेदीदार, वखारवाले हमाल, मापारी व मदतनीस या सर्व घटकांना त्यांच्या परवाना नूतनीकरण करावा लागणार आहे. यावेली अडत्यांकरिता एक लाख, खरेदीदारासाठी दोन लाख सॉल्व्हंसी अथवा बँक गॅरंटी; ती त्रयस्त इसमाची असल्यास २०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर त्या व्यक्तीची हमी असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. विद्युत बिल वा रेशन कार्ड, महापालिकेचा रहिवासी दाखला, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड किंवा पारपत्र यापैकी एक रहिवासी पुरावा सादर करावा लागेल. ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड, फोटो असलेले बँकेचे पासबूक, वाहन चालविण्याचा परवाना, पारपत्र यापैकी एक आवश्यक आहे. अर्जदाराकडील बाजार फी, सुपरव्हिजन फी भरलेली असणे आवश्यक आहे. गाळेधारकांचा १०० रुपयांचे स्टॅम्पपेपरवरील करारनामा आवश्यक आहे. त्रयस्थ व्यक्तीने हमी घेतली असल्यास त्या व्यक्तीला स्वत: हजर रहावे लागणार आहे. ज्या परवान्यावर व्यवहार झालेला नाही, त्याचे नूतनीकरण करण्यात येणार नाही. शासन निर्णयानुसार आता शेतकरी मतदान अधिकारानुसार त्या परवानाधारकाकडे शेतमाल विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांच्या नावाची यादी अर्जासोबतच्या नमुन्यात भरावी लागणार आहे. याशिवाय अडत्याकडे इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटा वापरणे अनिवार्य असल्याने या वजनकाट्याशिवाय परवान्याचे नूतनीकरण होणार नसल्याचे बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर यांनी सांगितले.
अडत्यांची परवान्यासाठी ई-नाम माहिती अनिवार्य
अडत्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करताना यावेळी प्रथमच ई-नामबाबत माहितीचा नमुना जोडावा लागणार आहे. मोबाइलवर ई-नाम अ‍ॅप आवश्यक आहे. ज्या शेतकºयांनी शेतमालाची विक्री केली, त्यांची विहित नमुन्यात माहिती सादर करावी लागणार आहे. त्याशिवाय परवान्याचे नूतनीकरणच होणार नाही. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटा खरेदीची पावती आवश्यक आहे.
तक्रार असल्यास खरेदीदारांचा परवाना वांध्यात
खरेदीदारांना परवाना नूतनीकरण करतेवेळी ई-नाम योजनेचा अर्ज भरून द्यावा लागणार आहे. यामध्ये बँक खात्याचे तपशीलदेखील हवेत. गतवर्षी अडत्यांची पेमेंट वेळेवर केले नसल्याची तक्रार असल्यास किंवा मातेरा खरेदी-विक्री केल्याचे आढळल्यास परवाना नूतनीकरण होणार नसल्याचे बाजार समितीने बजावले. ज्यांच्याकडे दुकान आहे, त्यांना बाजार समितीकडे भाडे, महापालिका कर, विद्युत बिलाचा भरणा करणे बंधनकारक आहे.

शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी कुठलाही त्रास होणार नाही व बाजार समितीचा कारभार पारदर्शी राहावा, यासाठी काही अटी-शर्ती नव्याने टाकण्यात आल्यात.
- नाना नागमोते
उपसभापती, बाजार समिती

Web Title: Rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.