मोठा चिखल्या पक्ष्याची दुर्मिळ नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:32 PM2018-08-17T22:32:59+5:302018-08-17T22:33:24+5:30

जिल्ह्यातील मालखेड सावंगा तलावावर मोठा चिखल्या या स्थलांतरित पक्ष्याची दुर्मीळ नोंद पक्षिमित्रांनी घेतली. या आश्चर्यकारक नोंदीमुळे पक्षिप्रेमींकडून आनंद व्यक्त करण्यात आला. शुभम गिरी, प्रशांत निकम पाटील आणि अभिमन्यू आराध्य हे पक्षी निरीक्षण आणि छायाचित्रणासाठी १५ आॅगस्ट रोजी तलाव परिसरात गेले. त्यांना तलावाच्या काठावरील चिखलात काही पक्षी दिसले.

The rare record of the big muddy fowl | मोठा चिखल्या पक्ष्याची दुर्मिळ नोंद

मोठा चिखल्या पक्ष्याची दुर्मिळ नोंद

googlenewsNext
ठळक मुद्देथंड हवामान पसंत : अमरावतीत पहिल्यांदाच दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील मालखेड सावंगा तलावावर मोठा चिखल्या या स्थलांतरित पक्ष्याची दुर्मीळ नोंद पक्षिमित्रांनी घेतली. या आश्चर्यकारक नोंदीमुळे पक्षिप्रेमींकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
शुभम गिरी, प्रशांत निकम पाटील आणि अभिमन्यू आराध्य हे पक्षी निरीक्षण आणि छायाचित्रणासाठी १५ आॅगस्ट रोजी तलाव परिसरात गेले. त्यांना तलावाच्या काठावरील चिखलात काही पक्षी दिसले. त्यांनी पक्ष्यांची छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्यांनी छोटा कंठेरी चिखल्या, केंटीशचा चिखल्या आणि शेकाट्या पक्ष्यासोबत एक वेगळा पक्षी टिपला गेला. तो होता मोठा चिखल्या. भारतात प्रामुख्याने हिवाळ्यात स्थलांतरण करून येमोठा चिखल्या पश्चिम किनारपट्टी तसेच ओडिशा येथून स्थलांतर करून येतो. मे अखेरीस परतीच्या प्रवासादरम्यान तिबेट, हिमालयाच्या परिसरात आणि अफगाणिस्तान या भागात आढळून येत असल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे भर पावसाळ्यात मोठ्या चिखल्याची नोंद दुर्मीळ मानली जात आहे. हवामान बदलाची चर्चा झडत असताना या पक्ष्याचे असा अवेळी आगमन आश्यर्चजनक आहे.
ही आहेत वैशिष्ट्ये
मोठा चिखल्या पक्ष्याचे इंग्रजी नाव 'ग्रेटर सॅन्ड प्लॉवर' असे असून, शास्त्रीय नाव 'काराड्रिअस लेसचेनूलिटी' आहे. हा पक्षी फिकट रंगाचा असून, चोच काळी, जाड व लांब असते. डोके आणि डोळे यामधील भाग पिवळसर पांढरा असतो. डोळा आणि कानाला जोडणाऱ्या पट्टीचा रंग तपकिरी असतो. छातीचा भाग पांढरा असतो व छातीवर पिवळसर तपकिरी रंगाचे पट्टे असतात. याशिवाय इतर भागाचा रंग राखट पिंगट दिसून येतो. पर्यावरण संवर्धनात वाटा असणाºया चिखल्या पक्ष्याचे तलावाच्या काठावरील कीटक खाद्य आहे. अमरावती जिल्ह्यात पोषक वातावरण मिळाल्याचे निरीक्षण पक्षिमित्रांचे आहे.

Web Title: The rare record of the big muddy fowl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.