रब्बी हंगाम स्थिरावला, यवतमाळ-बुलडाण्यात सरासरीपेक्षा अधिक पेरणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 06:54 PM2018-01-19T18:54:14+5:302018-01-19T18:54:38+5:30

यंदाचा रब्बी हंगाम ५ लाख ३९ हजार हेक्टरवर स्थिरावला. ही टक्केवारी ९६ आहे. यामध्ये यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी झाली, तर वाशिम, अकोला व अमरावती जिल्हे माघारले आहेत. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्र नापेर राहिल्याचे वास्तव आहे.

Rabbi season stabilized, Yavatmal-Buldada sown more than average | रब्बी हंगाम स्थिरावला, यवतमाळ-बुलडाण्यात सरासरीपेक्षा अधिक पेरणी

रब्बी हंगाम स्थिरावला, यवतमाळ-बुलडाण्यात सरासरीपेक्षा अधिक पेरणी

googlenewsNext

अमरावती : विभागात यंदाचा रब्बी हंगाम ५ लाख ३९ हजार हेक्टरवर स्थिरावला. ही टक्केवारी ९६ आहे. यामध्ये यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी झाली, तर वाशिम, अकोला व अमरावती जिल्हे माघारले आहेत. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्र नापेर राहिल्याचे वास्तव आहे.

अमरावती विभागात यंदाच्या रब्बी हंगामात ५ लाख ५९ हजार ५०० हेक्टरवर पेरणाचा अंदाज होता. त्याच्या तुलनेत सद्यस्थितीत ५ लाख ३९ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. यंदा डिसेंबरपासून थंडी असल्याने गव्हाची पेरणी यंदा लवकर आटोपली. खरिपात पाऊस सरासरीपेक्षा २६ टक्के कमी झाल्याने जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे. पाण्याची पातळी आॅक्टोबर महिन्यातच दोन मीटरपेक्षा खोल गेल्याने सिंचनक्षमतांना मर्यादा आल्या आहेत. विहिरीतील पाण्याचीदेखील कमी झाली. त्याच्या परिणामी अमरावती, अकोला व वाशिम जिल्ह्यात सरासरीपेक्षा पेरणी कमी झाली. यामुळे जिल्ह्यातील सरासरी क्षेत्राच्या तुलनेत २० हजार २०० हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. अकोला जिल्ह्यात २९ हजार ८०० हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ३२ हजार ६०० हेक्टर, तर अमरावती जिल्ह्यात ७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र नापेर आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत  बुलडाणा जिल्ह्यात २३ हजार ४०० हेक्टर व यवतमाळ जिल्ह्यात २६ हजार १०० हेक्टरमध्ये अधिक पेरणी झाली आहे.

सध्या बुलडाणा जिल्ह्यात सरासरी १ लाख ३९ हजार ८०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ६३ हजार २०० हेक्टरमध्ये अधिक पेरणी झालेली आहे. अकोला जिल्ह्यात १ लाख ४ हजार २०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ७४ हजार ४००, वाशिम जिल्ह्यात ९२ हजार ६०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ६० हजार हेक्टरमध्ये, अमरावती जिल्ह्यात १ लाख ४४ हजार ९०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ३७ हजार ४०० हेक्टर व यवतमाळ जिल्ह्यात ७८ हजार सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ४ हजार क्षेत्रात पेरणी झाली आहे.

हरभ-याचे ४.२३ लाख हेक्टर क्षेत्र-
 यंदाच्या रबीमध्ये हरभ-यासाठी ३ लाख ४२ हजार ३०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना, प्रत्यक्षात ४ लाख २३ हजार ७०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही टक्केवारी १२४ आहे. गव्हासाठी १ लाख ८० हजार ७०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना, प्रत्यक्षात ९५ हजार ५०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही टक्केवारी ५५ आहे. जवस, तीळ व तेलबियाचे क्षेत्र यंदा निरंक राहिले आहे. रबी ज्वार ८० टक्के, तर करडईचे १४ टक्के क्षेत्रात पेरणी झालेली आहे.

Web Title: Rabbi season stabilized, Yavatmal-Buldada sown more than average

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.