राणांचा विषय गुन्हेगारीचा सीपी म्हणतात, सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:49 AM2018-11-23T00:49:25+5:302018-11-23T00:50:17+5:30

वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, या विषयात आ. रवि राणा यांनी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्याशी तब्बल ३० मिनिटे बंदद्वार चर्चा केली.

Raan's topic is called crime cops, goodwill visit | राणांचा विषय गुन्हेगारीचा सीपी म्हणतात, सदिच्छा भेट

राणांचा विषय गुन्हेगारीचा सीपी म्हणतात, सदिच्छा भेट

Next
ठळक मुद्देतफावत का? : ३० मिनिटांची बंदद्वार चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, या विषयात आ. रवि राणा यांनी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्याशी तब्बल ३० मिनिटे बंदद्वार चर्चा केली. मात्र, आ. रवि राणा यांनी सदिच्छा भेट दिल्याचे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी सांगितले.
आ. रवि राणा व पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्यातील संभाषणात तफावत का, असा प्रश्न माध्यमांना पडला होता. पोलीस आयुक्तालय हद्दीत गेल्या काही दिवसांत घडलेल्या गुन्हेविषयक मोठ्या घटनांमुळे अमरावतीकर धास्तावले आहेत. जबरी चोरी, घरफोडी, हत्येसारखी गंभीर प्रकरणे शहरात वाढल्याचे पाहून आ. रवि राणा यांनी गुरुवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन गुन्हेविषयक मुद्द्यांवर चर्चा केली व तात्काळ ठोस उपाययोजना करण्यास सूचविले. गाडगेनगर हद्दीतील हजरत बिलालनगर येथील ताहेरा बानो अदील अहमद या वृद्धेची भरदिवसा हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांनी त्यांच्या घरातून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला. दुसºयाच दिवशी शारदानगरात अ‍ॅड. नारायण टावरी यांच्याकडे ३० लाखांची घरफोडी झाली. शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याने आ. रवि राणा उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत नारायण टावरी व ताहेरा बानो यांचे काही नातेवाईकसुद्धा उपस्थित होते. आ. राणा यांनी पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांच्यासोबत तब्बल ३० मिनिटे बंदद्वार चर्चा केली.
राणांची भेट वैयक्तिक
आमदार रवि राणा यांनी सदिच्छा भेट दिली. ते वैयक्तिक विषय घेऊन आले होते. चोरी व हत्येच्या प्रकरणाचे धागेदोरे गवसले असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली आहे. आपणदेखील मध्यरात्रीपर्यत पेट्रोलिंगमध्ये सहभागी होत आहोत. गुन्हे घडू नये, यासाठी पोलीस प्रयत्नरत असले तरी गुन्हे घडल्यानंतर गुन्हेगारांना शोधण्याचे आव्हान आमच्यापुढे असल्याचे पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शहरातील वाहतुकीची कोंडी रस्त्यांच्या बांधकामामुळे होत असल्याचे ते म्हणाले. काळ बदलत असताना गुन्हेगारीचे स्वरूपदेखील बदलत आहे. गुन्हेगारदेखील नव्या पद्धतीने गुन्हे करीत असल्याचे ते म्हणाले.
पोलिसांनी चोख कर्तव्य बजावावे
चर्चेनंतर आ. रवि राणा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शहरातील वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनला असून, गुन्ह्यांवर अंकुश बसावा, यासाठी आपण पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पोलीस आयुक्तांनी हत्या व चोरी प्रकरणात तपासाला गती देण्याचे मान्य केले. दोन्ही प्रकरणांचा लवकरच छडा लावण्याचे आश्वासन दिले. यासाठी पाच पथके गठित करण्यात आली आहेत. दोन उपायुक्तांकडे चोरी व हत्येच्या प्रकरणांचा तपास करीत आहेत. शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असले तरी पोलीसांनी अधिक चोखपणे कर्तव्य बजावावे, असेही आ. राणा यावेळी म्हणाले.

Web Title: Raan's topic is called crime cops, goodwill visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.