तरुणीवर लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव, आरोपीवर बलात्कारासह अॅस्ट्रोसिटीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 06:11 PM2018-01-17T18:11:36+5:302018-01-17T18:12:41+5:30

प्रेमसंबध प्रस्थापित करून एका तरुणीचे अपहरण केले आणि लैंगिक अत्याचारानंतर धर्मांतरासाठी तिला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध बलात्कार व अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. 

The pressure of conversion by sexual assault on the girl | तरुणीवर लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव, आरोपीवर बलात्कारासह अॅस्ट्रोसिटीचा गुन्हा

तरुणीवर लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव, आरोपीवर बलात्कारासह अॅस्ट्रोसिटीचा गुन्हा

Next

अमरावती -  प्रेमसंबध प्रस्थापित करून एका तरुणीचे अपहरण केले आणि लैंगिक अत्याचारानंतर धर्मांतरासाठी तिला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी फईम अब्दुल जाकीर अब्दुल (२२, रा. राहुलनगर) याच्याविरुद्ध बलात्कार व अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. 
     आरोपी फईम अब्दुल याने एका १८ वर्षीय मुलीशी प्रेमसंबध प्रस्थापित करून तिला विवाहबंधनात अडकविले. तिच्याशी शारीरिक संबंध झाल्यानंतर त्याने तिला मुस्लीम धर्म स्वीकारण्याचा आग्रह धरला. एवढेच नव्हे तर तिने तयार व्हावे, यासाठी घरात डांबून ठेवले आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. फईमने तिच्या आई-वडिलांच्या आजाराचा फायदा घेऊन माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप पीडित तरुणीने फे्रजरपुरा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी फईम अब्दुलविरुद्ध भादंविचे कलम ३६३, ३६६, ३४१, २९५ (अ), ३७६ (अ), ३८४, ५०६, अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टच्या कलम ३(२) नुसार गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त पी.डी. डोंगरदिवे करीत आहेत. 

लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरासाठी धमक्या दिल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. 
- आसाराम चोरमले, पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा 

Web Title: The pressure of conversion by sexual assault on the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.