मुलांना घडविण्याची जबाबदारी शाळांसोबत पालकांचीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:26 PM2019-07-18T23:26:10+5:302019-07-18T23:26:29+5:30

मुलांना घडविण्याची जबाबदारी शाळांची निश्चितच आहे. पण, तेवढीच पालकांचीदेखील आहे. पालकांनी त्यांच्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत. मुलांची पहिली शिक्षक आई आहे. तिने जर मुलांना घडविले, तर देशाचे चांगले नागरिक होतील, असा सूर ‘लोकमत बालविकास मंचाद्वारे आयोजित मुख्याध्यापकांच्या चर्चासत्रात निघाला.

Parents also have the responsibility of raising children | मुलांना घडविण्याची जबाबदारी शाळांसोबत पालकांचीही

मुलांना घडविण्याची जबाबदारी शाळांसोबत पालकांचीही

Next
ठळक मुद्देबालविकास मंचातर्फे चर्चासत्र : मुख्याध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुलांना घडविण्याची जबाबदारी शाळांची निश्चितच आहे. पण, तेवढीच पालकांचीदेखील आहे. पालकांनी त्यांच्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत. मुलांची पहिली शिक्षक आई आहे. तिने जर मुलांना घडविले, तर देशाचे चांगले नागरिक होतील, असा सूर ‘लोकमत बालविकास मंचाद्वारे आयोजित मुख्याध्यापकांच्या चर्चासत्रात निघाला.
लोकमत बालविकास मंच संस्काराचे मोती स्पर्धेच्या निमित्ताने येथील एका हॉटेलमध्ये शहरातील शाळांच्या मुख्याध्यापकांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी अन् पालक या विषयावर उपस्थित सर्व माध्यमांच्या मुख्याध्यापकांनी दिलखुलास चर्चा केली. मुलांमध्ये वाचनाची आवड वाढविणे महत्त्वाचे आहे. मुलं चार ते पाचच तास शाळेत असतात. त्यापेक्षा अधिक काळ घरी पालकांच्या सहवासात असतात. त्यामुळे मुले घडविण्यासाठी पालकांचीही जबाबदारी वाढतेच, सर्व अपेक्षा शाळांकडून कशा पूर्ण करणार? शाळांची जबाबदारी वाढविण्यात आली. पालकांच्याही शाळांकडून खूप अपेक्षा आहेत. प्रत्यक्षात शाळा अन् पालकांच्या भागिदारीतून जबाबदार मुले तयार होतील, असे उपस्थित मुख्याध्यापकांनी यावेळी स्पष्ट केले.
मुलं ऐकत नाहीत नाहीत, तर असे का ऐकत नाही, आईच्या हाती मोईल किती वेळ असावा, टीव्ही किती वेळ बघावा यालाही काही मर्यादा आहेत. मुलांना मोबार्ईलपासून दूर ठेवायला हवे, मुलाचा अभ्यास, त्याचा खेळ अन् त्याचा आहार यासह अनेक विषयांवर उपस्थित मुख्याध्यापकांनी मते मांडली. शासनाचे नियमदेखील शाळांच्या कार्यात बाधा निर्माण करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. चर्चासत्रात ‘लोकमत’चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे यांनी प्रास्ताविकाद्वारे चर्चासत्राची संकल्पना विषद केली.
या मुख्याध्यापकांचा चर्चेत सहभाग
विजय वाघमारे, कांचन पाठक (गोल्डन किड्स), कांचनमाला गावंडे ( अभ्यासा स्कूल), पंकज केवलरामानी (के.के. केंब्रिज स्कूल), उज्ज्वला चिखलकर (दीपा प्रायमरी स्कूल), अर्चना देशपांडे, मीनाश्री मिश्रा (पोदार इंटरनॅशनल), विजया कलानी (सामरा स्कूल), सारिका ढोले (महर्षी पब्लिक स्कूल), किशोर गुल्हाने (अरुणोदय स्कूल), साधना वाघमारे (स्कॉलर्स कॉन्व्हेंट) , विजय मामनकर (पी.आर. पोटे स्कूल)

Web Title: Parents also have the responsibility of raising children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.