कुलगुरुंनी अ‍ॅन्टी रॅगिंगवर विद्यार्थ्यांशी साधला आॅनलाईन संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 11:17 PM2017-09-21T23:17:22+5:302017-09-21T23:17:36+5:30

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी रॅगिंगला आळा बसावा, या संदर्भात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांशी आॅनलाईन व्हीडीओ कॉन्फरींन्सगने संवाद साधला.

Online Communication with the Chancellor on Anti Ragging Students | कुलगुरुंनी अ‍ॅन्टी रॅगिंगवर विद्यार्थ्यांशी साधला आॅनलाईन संवाद

कुलगुरुंनी अ‍ॅन्टी रॅगिंगवर विद्यार्थ्यांशी साधला आॅनलाईन संवाद

Next
ठळक मुद्देमुरलीधर चांदेकर : नवागतांना अतिथींचा दर्जा द्यावा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी रॅगिंगला आळा बसावा, या संदर्भात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांशी आॅनलाईन व्हीडीओ कॉन्फरींन्सगने संवाद साधला. भारतीयांना श्रीमंत संस्कृती लाभली आहे; पण आपल्या समृद्ध संस्कृतीचे स्मरण प्रत्येकाने वारंवार करावे आणि त्याची जाण ठेवून जीवन कार्याला गती देऊन सफल होण्यासाठी प्रयत्न करावयाचा आहे. अतिथी देवो भव: या उक्तीप्रमाणे कुठल्याही महाविद्यालयात नव्याने येणाºया विद्यार्थ्याला अतिथीप्रमाणे समजून त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सकारात्मक दृष्टीने कार्य करण्याची गरज आहे, असे कुलगुरू म्हणाले.
७ जून, २००९ रोजी युजीसीने रॅगिंगविरुद्ध परिपत्रक काढून रॅगिंगला आळा बसावा, अशा सूचना सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना दिल्या. त्यापूर्वी राघवन कमिशनने रॅगिंगला समर्थन दिले होते. रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांचे नेतृत्व विकसित होते; पण त्यावेळी रॅगिंग सकारात्मक स्वरुपाची होती. यावेळी कुलसचिव अजय देशमुख व अधिष्ठाता तथा अ‍ॅन्टी रॅगिंग समितीचे सदस्य मनोज तायडे उपस्थित होते.प्रास्ताविक तायडे यांनी केले. युट्युबवर कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी अ‍ॅन्टी रॅगिंग विषयावर केलेल्या भाषणाच्या माहितीचा व्हिडीओ ‘एस.जी.बी.ए.यू. लाईफ स्ट्रीम’वर उपलब्ध असून त्याला विद्यार्थ्यांकडून खूप प्रतिसाद मिळाल्या.

Web Title: Online Communication with the Chancellor on Anti Ragging Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.